Maharashtra Politics : शरद पवार गटाची महत्वाची बैठक; पक्षाने जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

sharad pawar group news : आज मुंबईत शरद पवार गटाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Sharad Pawar news
Sharad Pawar Saamtv
Published On

सुनील काळे, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार गट कामाला लागला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाने आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जिंतेद्र आव्हाड, रोहित आर आर पाटील आणि उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांवर जबाबदारी सोपवण्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तिन्ही नेत्यांकडे मोठी जबाबदारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Sharad Pawar news
Rohit Pawar News : राम शिंदे यांचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाच आव्हान; फेर तपासणीवरून रोहित पवारांची टीका

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत विधीमंडळात गटनेतापदी जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोदपदी रोहित आर आर पाटील, प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची नेमणूक करण्यात आली.

शरद पवार गटाच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, 'विधिमंडळ नेता आज निवडला गेला नाही. संदीप क्षीरसागर आज उपस्थित‌ नव्हते. आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं, याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. फॉर्म १७ आणि मतांची आकडेवारी जुळत नसेल तर हे फार गंभीर आहे'.

Sharad Pawar news
Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, भाजप कार्यर्त्यांकडून तक्रार, मुलगा अन् मुलीविरोधात गुन्हा दाखल

'उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातल्या मर्कटवाडी येथील लोक मतपत्रिकेवर मतदान घेणार आहेत. मंगळवारी तिथं मतदान होणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की, त्या गावात विरोधी उमेदवाराला एवढं मतदान होणार नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या, याला आमचा पाठिंबा आहे. राजू खरे यांच्या मतदारसंघात दोन लोकांना पकडले. त्यांच्याकडे १४ फोन, १४ लॅपटॉप होते. खरे जिंकून आल्यावर त्यांना सोडून दिलं. तिथं पोलीस तक्रारही घेत नव्हते. बाबा आढाव यांनी केलेलं आंदोलन राज्यभरात राबवलं पाहिजे, असे ते म्हणाले.

Sharad Pawar news
Vidhan Sabha Election : मराठवाड्यात मनसेच्या हाती भोपळा; १७ उमेदवारांना मिळून २९ हजार २८६ मते

'निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद करण्यात आली होती. हे चूक आहे. माहिती दडपण्याचा हा प्रकार दिसतो. लाडक्या बहीणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सरकर करत आहे. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांनाही योजनेची संधी द्यावी. सरकारने लवकरात २१०० रुपये सुरु करावे. सोयाबीनला ६००० रुपये भाव द्या. शपथ घेऊन लोकांना लवकर दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे, असे जयंत पाटील पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com