Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, भाजप कार्यर्त्यांकडून तक्रार, मुलगा अन् मुलीविरोधात गुन्हा दाखल

Shivsena Shinde Group MLA Amshya Padvi: शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आमश्या पाडवी यांच्यावर भाजपच्या कार्यकर्तीने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, भाजप कार्यर्त्यांकडून गुन्हा दाखल
Shivsena Shinde Group MLA Amshya PadviSaamTv
Published On

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये वाद, राडा आणि भांडणं झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नंदूरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवामध्ये देखील राडा झाल्याची घटना घडली होती. सोरापाडा येथे भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाला होता. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमश्या पाडवी यांच्यावर एका महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीमधील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष पाहयला मिळाला. शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार अमश्या पाडवींच्या अडचणीत वाढ झाली आहे. अक्कलकुनवाच्या सोरापाडा येथे दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणात आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, भाजप कार्यर्त्यांकडून गुन्हा दाखल
Maharashtra Politics : महायुतीचा फॉर्म्युला राहिला बाजूला, सत्ता स्थापनेचा महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सोशल मीडियावर व्हायरल

ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी यांच्याविरोधात काम केल्याचा रागातून कुटुंबातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आमश्या पाडवी यांच्यावर करण्यात आला आहे. आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, भाजप कार्यर्त्यांकडून गुन्हा दाखल
Maharashtra Politics : पराभूत उमेदवाराला जास्त मतदान कसं? गावकऱ्यांना ईव्हीएमवर शंका, फेरमतदान घेणार

आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलीनेही भाजपा पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी,, भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी यांच्यासह पीडित महिला आणि तिच्या भावाविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, भाजप कार्यर्त्यांकडून गुन्हा दाखल
Maharashtra Politics : कन्फर्म! महायुती सरकारच्या शपथविधीचा नवा मुहूर्त; ठिकाण आणि तारीख ठरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com