Maharashtra Politics : पराभूत उमेदवाराला जास्त मतदान कसं? गावकऱ्यांना ईव्हीएमवर शंका, फेरमतदान घेणार

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केली आहे. राज्यातील काही मतदारसंघात ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी भाजप नेत्यांनी केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsyandex
Published On

विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केली आहे. माळशिरसच्या मारकडवाडी ग्रामस्थांचा ईव्हीएमवर संशय आहे. विजयी उमेदवारापेक्षा पराभूत उमेदवाराला अधिक मतदान झाल्याने येथील ग्रामस्थांचा ईव्हीएमवरील संशय बळावला. महाराष्ट्रातल्या एकूण 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेत.

मतदान घेण्यासाठी तहसीलदारांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. 3 डिसेंबर रोजी ग्रामस्थ स्वतः (चाचणी) फेर मतदान घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांना अधिक मतदान होण्याची अपेक्षा असताना भाजप उमेदवार राम सातपुते यांना गावातून 160 इतके मताधिक्य मिळाले. राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Politics
PMPML Bus: पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल, १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणी करता येते. एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी 47 हजार 200 रुपये शुल्क लागतं. कोर्टात कुणी आव्हान न दिल्यास अर्ज केल्याच्या 45 दिवसांत ही पडताळणी होते.

या शुल्काचा भरणा केल्यानंतर त्यांचा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून २२ डिसेंबरपूर्वी याबाबत पडताळणीची तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यानुसार निश्चित तारखेला संबंधित उमेदवारांना बोलावून ही पडताळणी करून दाखविली जाईल.

Maharashtra Politics
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी आराम करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com