Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी आराम करणार

Eknath Shinde: दिल्लीमध्ये महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत आज बैठक होणार होती. त्याआधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली.
Eknath Shinde
Eknath Shindeyandex
Published On

महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत आज बैठक होणार होती. मात्र त्याआधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली. किरकोळ ताप, कणकणी असल्याने दिवसभर विश्रांती घेणार आहेत. मुख्यमंत्रिपद नाही तर किमान गृहमंत्रीपद मिळेल या आशेवर असलेले एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी सातारा येथील आपल्या गावी निघून गेले.

यामुळे दिल्लीत ठरल्याप्रमाणे मुंबईत होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली. यानंतर महायुतीत ते नाराज असल्याची चर्चा रंगली. आज दिवसभर कुणालाही भेटणार नसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला आहे तो एकनाथ शिंदे यांनाच माहीत आहे.

उपमुख्यमंत्री व्हायचं की नाही हे शिंदेच ठरवतील. त्यांनी सरकारमध्ये रहावं अशी आमची इच्छा आहे. मी खरं सांगतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही. पण एकनाथ शिंदे यांना ताप होता. सर्दी होती. त्यांची प्रकृती चांगली नाही. पण ते नाराज नाहीत, पण अस्वस्थ आहेत. चांगल्या हवामानासाठी ते गावी गेले आहेत, असे उदय सामंत म्हणाले.

Eknath Shinde
PMPML Bus: पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल, १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी ५ डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जात आहे. दादार येथील शिवतीर्थ म्हणजेच शिवाजीपार्कवर २ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याचं ठरत होतं, मात्र ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे शिवतीर्थ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ५ डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! येत्या वर्षी केंद्राकडून 300 नव्या लोकलचं गिफ्ट आणि बरंच काही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com