Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! येत्या वर्षी केंद्राकडून 300 नव्या लोकलचं गिफ्ट आणि बरंच काही...

Mumbai Local Train: केंद्र सरकारनं मुंबईसाठी रेल्वेच्या तीन योजनांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेत 300 नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
Local Train
Local Trainyandex
Published On

केंद्र सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिलं आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स सुरु केल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली असून यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आभार मानलं आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करुन एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यात भाजपानं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपानं आता मुंबई आणि आसपासच्या महापालिकाच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईकरांसाठी 300 नवीन लोकल ट्रेन्स उपलब्ध होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं 3 मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे.

Local Train
Dadar Railway Station: दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये पुन्हा बदल

पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्सची, तसेच मध्य रेल्वेवरच्या परळ, लोकमान्य टिळक टर्मिनल, कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरच्या जोगेश्वरी आणि वसई रोड स्थानकांवर नवी टर्मिनल्स उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Local Train
Mumbai Local Train: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वेवर आजपासून धावणार 13 एसी लोकल, वेळापत्रक जाणून घ्या

या परियोजनांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. यासोबतच एमएमआर रिजनमध्ये कनेक्टिव्हिटी, व्यापार वाढणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांसाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं 27 नोव्हेंबरपासून मुंबईत 13 अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ही आता 96 वरुन 109 वर पोहोचली आहे.

Local Train
Maharashtra Weather Upadte: पुण्याचा पारा ८.७ अंशांवर, राज्यातील 'या' भागांत थंडीच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com