Dadar Railway Station: दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये पुन्हा बदल

Dadar Railway Station Platform Numbers Changed Again: दादर स्टेशनमध्ये फलाट क्रमांक 10 हा 9A तर फलाट क्रमांक 10A हा 10 होणार आहे.
Dadar Railway Station
Dadar Railway Stationyandex
Published On

मुंबईमध्ये मध्य रेल्वेकडून दादर रेल्वे स्थानकामध्ये आज २७ नोव्हेंबर पासून दोन प्लॅटफॉर्मच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहे. आता फलाट क्रमांक १० हा ९A होणार आहे, तर फलाट क्रमांक १०A हा १० होणार आहे. यामध्ये नव्या रचनेनुसार, फलाट क्रमांक १०वर मेल एक्स्प्रेस येतील तर फलाट क्रमांक ९A वर लोकल ट्रेन येणार आहेत.

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयी वाढवण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या टप्प्यात दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्याचे कारण प्लॅटफॉर्म क्रमांक १०ची सध्याची लांबी २२ डबे असलेल्या गाड्या हाताळण्यासाठी अपुरी आहे, परिणामी ट्रेन मॅनेजर (गार्ड)च्या बाजूने ३ डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर राहतात.

Dadar Railway Station
Maharashtra Weather Update: राज्याला भरली हुडहूडी! उत्तर महाराष्ट्र गारठला, कुठे किती तापमान?

मुख्य बदल:

1. प्लॅटफॉर्म क्रमांक १० (जेथे पूर्वी मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या दोन्ही थांबत होत्या) त्याचे प्लॅटफॉर्म क्रमांक ९ ए असे बदल करण्यात आले आहे आणि ते फक्त उपनगरीय गाड्यांना सेवा देईल.

2. प्लॅटफॉर्म १० ए (जेथे पूर्वी मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या देखील थांबत होत्या) चे प्लॅटफॉर्म क्रमांक १० असे करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म आता फक्त मेल/एक्स्प्रेस गाड्यांना सेवा देऊन २२ डब्यांच्या गाड्यांसाठी पुरेशी जागा सुनिश्चित करेल.

Dadar Railway Station
Mumbai Local Train: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वेवर आजपासून धावणार 13 एसी लोकल, वेळापत्रक जाणून घ्या

पूर्वीचा प्लॅटफॉर्म क्रमांक - नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक

०८ - ०८

०९ - ०९

१० - ९ ए

१० ए - १०

११ - ११

१२ - १२

१३ - १३

१४ - १४

प्रवाशांच्या सोयी सुधारण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, मध्य रेल्वेने दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकांत बदल केले आहेत. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म ओळख सुलभ करणे आणि अखंड प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करणे हा आहे.

Dadar Railway Station
Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com