Mumbai Local Train: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वेवर आजपासून धावणार 13 एसी लोकल, वेळापत्रक जाणून घ्या

Mumbai Local Train Update: आज 27 नोव्हेंबर 2024 रोजी, या नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी, पहिली लोकल सेवा चर्चगेट येथून 12:34 वाजता धावेल.
Mumbai Local Train Update
Mumbai Local Train Updategoogle
Published On

मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक दिलासादायक बाब आहे. पश्चिम रेल्वेने मंगळवारी मुंबई लोकल ट्रेनचे अपडेट्स शेअर करताना सांगितले की, 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी लोकल ट्रेन सेवा सुरू केल्या जाणार आहेत. या सेवांची सेवेची भर पडल्याने एसी लोकल सेवांची एकूण संख्या 96 वरून 109 होईल आणि शनिवार आणि रविवारी 52 वरून 65 पर्यंत वाढतील. प्रवाशांची लोकप्रियता आणि वाढती मागणी पाहता, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरी विभागात एसी लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या फेऱ्या अंधेरी, वांद्रे आणि भाईंदर स्थानकातून धावणार आहेत. या स्थानकातून गर्दीमुळे एसी लोकलमध्ये प्रवेश करू न शकणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 25 डिसेंबर 2017 रोजी नाताळाच्या दिवशीच पहिली एसी मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यात आली होती. आता परत एकदा याच दिवशी एसी लोकल सेवेचा विस्तार करण्याचे नियोजन करत आहे. तथापि, पश्चिम रेल्वे नेटवर्कमध्ये नवीन गाड्यांची भर पडल्याने निश्चितच सेवा सुधारेल, 10 ते 12 अतिरिक्त एसी लोकल ट्रिप प्रशासनाकडून नियोजित केल्या आहेत.

Mumbai Local Train Update
Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी, विद्यमान नॉन एसी 12 कार सेवा बदलून आणखी 13 एसी सेवा वाढवल्या जात आहेत. या सेवा आठवड्यातील सर्व दिवस एसी सेवा म्हणून चालतील. एकूण सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही, म्हणजे 109 एसी लोकल ट्रेन सेवांसह लोकल सेवांची संख्या 1406 आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी, या नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी, पहिली लोकल सेवा चर्चगेट येथून 12:34 वाजता धावेल आणि त्यानंतर, नवीन दाखल झालेल्या सर्व एसी लोकलच्या नियमित धावा खालील वेळापत्रकानुसार धावतील.

Mumbai Local Train Update
Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पुढच्या महिन्यात एसी लोकल धावणार, १२ फेऱ्या वाढणार

विरार-वांद्रे आणि भाईंदर अंधेरीदरम्यान प्रत्येकी एक फेरी वाढवण्यात आली आहे. डाऊन अर्थात चर्चगेट-विरारदरम्यान दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. चर्चगेट-अंधेरी, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक फेरी वाढवण्यात आली आहे.

Mumbai Local Train Update
Kannauj Accident: कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! डिव्हायडर तोडून कार ट्रकला धडकली; पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com