Maharashtra Politics : कन्फर्म! महायुती सरकारच्या शपथविधीचा नवा मुहूर्त; ठिकाण आणि तारीख ठरली

mahayuti government : महायुतीच्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. या शपथविधीसाठी ठिकाण आणि तारीख ठरली आहे.
कन्फर्म! महायुती सरकारच्या शपथविधीचा नवा मुहूर्त; ठिकाण आणि तारीख ठरली
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं. महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडी ढेर झाल्याची दिसून आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर सत्ता स्थापनेवर गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज महायुतीचा सत्तावाटपाचा पेच जवळपास सुटल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता महायुती सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

राज्यातील महायुती सरकारचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नव्या सरकारचा शपथविधी हा ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील उच्च पदस्थ मंत्री देखील मुंबईत येणार आहेत.

राज्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक केंद्रीय मंत्री हजेरी लावणार आहेत. अनेक राज्यातील मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजल लाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.

कन्फर्म! महायुती सरकारच्या शपथविधीचा नवा मुहूर्त; ठिकाण आणि तारीख ठरली
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीसच आघाडीवर का? 5 महत्वाची कारणे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'पतंप्रधान मोदींच्या नेतृत्वात महायुतीचा ऐतिहासिक विजय प्राप्त झाला आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं यश महायुतीला मिळालं आहे. आता महायुती सरकारचा शपथविधी सोहला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा सोहळा मुंबईतील आझाद मैदानात ५ डिसेंबर रोजी ५ वाजता होणार आहे. या सोहळ्याची जनतेला प्रतीक्षा होती. येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याने महाराष्ट्रातील जनतेची प्रतीक्षा अखेर संपली आहे'.

दरम्यान, या शपथविधी सोहळ्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. तसेच इतर पक्षाचे प्रत्येकी एक-एक उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com