Sanjay Shirsat: एकनाथ शिंदे मोठा धक्का देणार? दरे गावात फायनल निर्णय; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राळ उडाली!

Sanjay Shirsat On Eknath Shinde Visit At Dare Village: महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा पेच कायम आहे. अशातच संजय शिरसाटांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
संजय शिरसाट
Sanjay Shirsat Saam Tv
Published On

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले असले तरीही मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा पेच अद्याप कायम आहे. अशातच एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार याबाबत शिंदे गटाचे आमार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचा मुख्यमंत्री कोण याच उत्तर अद्याप कोणालाच सापडलं नाही. म्हणून राजकारणात काय सुरू आहे का कोण CM होणार यावर चर्चा सुरू आहे .मुख्यमंत्री दरे गावी जात असतात.

मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगाव त्यांच आवडीचं ठिकाण आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं आहे की, सरकार स्थापन करण्यात माझा अडसर नाही. वरिष्ठ नेत्यांचा निर्णय पक्ष आणि मी बांधील असल्याचं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.दिल्लीत बैठकीत काय झालं देखील त्यांनी सांगितलं आहे. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे.

कोणाला मुख्यमंत्री कारावे हा निर्णय मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा. मुख्यमंत्री होण्यासाठी का वेळ लागतोय याची कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर खातेवाटपावर चर्चा होते. काही विद्वान सरकारवर टीका करत आहेत. अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत सरकार वाऱ्यावर सोडलं नाही. सोमवारी भाजपचे निरीक्षक येणार आहेत अशी बातमी आहेत. शिंदे का दरेगावला गेले याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही लाचारसारखे नाटक करणारी लोक नाही.आमची नाराजी आम्ही उघडपणे जाहीर करू लाचारीत ज्यांनी अडीच वर्ष घालवली त्यांच्या टीकेत काही अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या आरोपांवरदेखील उत्तर दिले आहे. मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं ते निकालावरून स्पष्ट आहे.यांना ६० जागा ही मिळवता आल्या नाहीत. मानसिक संतुलन यांचा बिघडलं आहे म्हणून इतर नेते बोलत नाही. यांना फक्त शेपूट हलवून चाकरी करणं माहीत आहे .भाजपने पद का दिलं यांची कल्पना त्यांना देखील आहे.किती वेळा भाजपच्या दारावर जाऊन परत आले हे राऊत यांना माहित आहे आम्ही आमच्या हिमतीवर मिळवलं आहे.

जनतेने गद्दारांना लाचारांना त्यांची जागा दाखवली आहे ४० लोकांनी उठाव केला आणि आमचे ५७ लोक निवडून आले. हे दिल्ली स्वरांना किती फोन करायचे शिंदेंना घेऊ नका आम्ही येतो अशा विनवण्या करायचे. घराका ना घाटका अशी अवस्था झाली आहे एकनाथ शिंदे लाचार नाहीत सिल्वर ओकला मुजरा करणारे नाहीत, असेही त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Shirsat On Eknath Shinde)

संजय शिरसाट
Latur News: एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या, एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार

एकही नेता त्यांना नेता बोलत नाही. एकनाथ शिंदे युतीच्या समन्वयकाच प्रमुख पदी आहेत.त्यांची उंची वाढली आहे. महायुतीचे सगळे नेते त्यांचा आदर करतात. सर्वस्वी निर्णय दिले आहेत. मुख्यमंत्री पदाच नाव जाहीर झाल्यानंतर इतर निर्णय घेतले जातील. मुख्यमंत्री पद भाजपकडे गेल्यानंतर गृहमंत्री पद आमच्याकडे असावा हा नैसर्गिक नियम आहे. ते खात आमच्याकडे असायला हरकत नाही. डॅशिंग नेता असावा त्या खात्यावर, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांनी अर्थ खात्याबाबतदेखील आपलं मतं मांडलं आहे. जे देतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही शिंदे साहेबांची भूमिका आहे. लाडकी बहीण योजना जाहीर करताना अर्थ खात्याने थोडा विरोध केला होता .१५०० ते २१०० करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मान्यता मिळाली हवी. या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट
Maharashtra CM: मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव फायनल, ५ डिसेंबरला होणार शपथविधी?

संजय शिरसाटांनी ईव्हीएममध्ये फ्रॉड झाले असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचे सांगितले आहेत. ईव्हीएम चर्चेवर सर्वसामान्य लोकांना रस नाही. कोर्ट जो निर्णय द्यायचा तो निर्णय देईल.लोकसभेला EVM चांगलं होत, असं त्यांनी म्हटलं आहे.महायुतीतून मंत्रीपदे कोणाला मिळणार असं संजय शिरसाट यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी म्हटलं की,आमच्याकडून मंत्री कोण होणार यांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. कोणाचा विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही.

संजय शिरसाट
Maharashtra Weather Update: राज्यभर हुडहुडी! पुण्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी, इतर ठिकाणी आज कसं आहे तापमान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com