PM Modi Speech
PM Narendra Modi Speech Washim: Saamtv

PM Modi Speech : लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट, धुळ्यात मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

PM Modi to Address Dhule : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर दोनवर आहे. लाडक्या बहिणींनी मविआतील नेत्यांपासून सावध राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Published on

PM Modi Speech Maharashtra Dhule : लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा आहे. ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. विरोधकांवर टीका करतानाच मोदींनी केलेल्या कामांचा पाढाही वाचला. त्याशिवाय मराठी भाषेवरही त्यांनी प्रकाश टाकला. मातृभाषा म्हणजे आपली आईच होय.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण केले. जगभरातून मराठी भाषिकांचे संदेश आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Maharashtra Assembly Elections 2024)

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट करण्यात आला. लाडक्या बहि‍णींनी मविआपसून सावध राहायला हवं, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi Speech Dhule)

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ?

धुळ्यातील सर्वांना रामराम. धुळ्यात भगवान खंडोबा यांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले.2014 च्या निवडणुकीत मी धुळ्यात आलो होतो. महाराष्ट्रात सत्ता देण्याचं आवाहन केलं होतं आणि आपण अभूतपूर्व यश दिलं होतं.

धुळ्यातून 2024 विधानसभा निवडणुकीची सुरूवात करत आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राला जी गती मिळाली आहे तिला थांबू देणार नाही. विरोधकांच्या गाडीला ना चाक आहेत, ना बसायला सीट आहे. लोकांना लुटणारे महाविकास आघाडीत येतात तेव्हा विकास थांबवतात. महाआघाडीने लुटमार केली. समृध्दी महामार्ग होण्यात अडचणी नर्माण केल्या. आपल्या आशीर्वादाने हे सर्व बदलले...

PM Modi Speech
Vadgaon Sheri Politics: पवार विरुद्ध पवार! पुण्यातील वडगाव शेरी मध्ये कोण ठरणार शक्तिशाली?

एकनाथ शिंदेंच्या सरकारने विकास केला. भाजप महायुती आहे तर गती आहे, तर प्रगती आहे. महायुतीचा 10 संकल्पाची मोठी चर्चा होत आहे. महायुतीचा संकल्पनामामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार. महायुतीचा वचननामा विकसित महाराष्ट्राचा भाग होणार आहे.

आमच्या बहीण-मुलींना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आणल्या आहेत. विधानसभामध्ये महिलांना हक्क दिला. विरोधक आमची खिल्ली उडवत होते. आज महाराष्ट्रात कागदपत्रांवर आईचे नाव लावावे लागत आहे. आमची सरकार महिलांसाठी जे करत आहे ते काँग्रेसला सहन होत नाही. लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात पोहचले होते, असा हल्लाबोल मोदींनी केला.

देशातील सर्वात मोठा पोर्ट महाराष्ट्रात होत आहे. आचारसंहिता संपेल महायुतीची शपतविधी पूर्ण होतच देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे.

धुळ्याण्यासाठी मोठा निधी दिला जात आहे. शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी सुट दिली जात आहे. धुळ्याच्या आजूबाजूला मोठया संख्येने आदिवासी राहतात. त्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे.

PM Modi Speech
Varsova Politics: बंडखोरीमुळे बदलली वर्सोवा मतदारसंघाची राजकीय समीकरणे! मत विभाजनाचा आणि नाराजीचा फायदा मनसेला होणार फायदा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com