Vadgaon Sheri Politics: पवार विरुद्ध पवार! पुण्यातील वडगाव शेरी मध्ये कोण ठरणार शक्तिशाली?

Maharashtra Assembly Election 2024: पुण्यातील वडगाव शेरीमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट आमनेसामने येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सुनील टिंगरे आणि बापूसाहेब पठारे अशी लढत होणार आहे.
Vadgaon Sheri
Vadgaon Sheri PoliticsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असलेले पुणे शहरात २ मतदारसंघ; एक म्हणजे हडपसर आणि दुसरा म्हणजे वडगाव शेरी. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चे विद्यमान आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून ओळख असलेले सुनील टिंगरे यांच्या समोर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी ची तुतारी हाती घेतलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे आव्हान असणार आहे.

Vadgaon Sheri
Assembly Election:निकालानंतर सत्ता समीकरण बदलणार? नवाब मलिकांपाठोपाठ वळसे पाटलांचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून वडगाव शेरी हा मतदारसंघ पुण्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे १८ मे रोजी झालेल्या कल्याणीनगर परिसरात "पोर्शे अपघात". एका अल्पवयीन तरुणाने भरधाव पोर्शे चालवत २ जणांचा जीव घेतला.

या अपघातातील आरोपींशी या ठिकाणच्या स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं काय कनेक्शन आहे? अपघाताप्रकरणी विद्यमान आमदार यांची चौकशी का झाली? खरचं त्यांचा काही हाथ आहे का अशा अनेक गप्पा राजकीय फडावर तर रंगल्याच तशा त्या अगदी नॅशनल मीडिया मध्ये सुद्धा रंगल्या. यामुळे वडगाव शेरी मध्ये पोर्शे अपघात हा कोणासाठी खरचं टर्निंग पॉइंट ठरणार हे वेळच सांगेल.

वडगाव शेरी हा मतदारसंघ पुणे शहराच्या उत्तर पुर्व भागात येत असून मतदारसंघाचे भौगोलिक पट्टा पाहिला तर खूप विस्तारला गेला आहे. मतदारसंघात येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, खराडी असे परिसर आहेत. मजूर, व्यापारी, आय टी, नोकरी करणारे असा मोठा वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे. स्थानिकांच्या व्यतिरिक्त बाहेरच्या जिल्ह्यातून किंबहुना राज्यातून सुद्धा अनेक जणं याच ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या मतदानाचा निकाल

सुनील टिंगरे: ९७ हजार ७०० मतं

जगदीश मुळीक: ९२ हजार ७२५ मतं

मताधिक्य: ४ हजार ९७५

Vadgaon Sheri
Nandurbar Politics: नंदुरबारमध्ये गावित कुटुंबाचा बोलबाला; एकाच जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ सदस्य रिंगणात

सुनील टिंगरे, अजित पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते

सुनील टिंगरे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी चे विद्यमान आमदार आहेत. सुनील टिंगरे हे व्यवसायाने जरी सिव्हिल इंजिनीअर असले तरी सुद्धा टिंगरे परिवाराला राजकीय वारसा राहिलेला आहे. सुनील यांचे आजोबा बाळासाहेब टिंगरे वडगाव शेरी परिसरातील धानोरी गावचे सरपंच राहिले आहेत. २००७ मध्ये सुनील यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला.

२०१२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांचा पत्ता कट झाला. २०१४ म्हणजेच मोदी लाटेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेमधून निवडणूक पण तेव्हा ही त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा अजित पवारांचा हाथ धरला आणि २०१९ मध्ये त्यांनी विधानसभेत बाजी मारली.

अनुभवी बापू पठारे यांच्या हाती तुतारी

पठारे यांनी नगरसेवक आणि महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे. बापू पठारे यांच्या विषयी सांगायचं झालं तर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच या मतदारसंघात निवडून आले. मात्र २०१४ मध्ये भाजपच्या जगदीश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र यंदा युती मध्ये ही जागा आपल्याला मिळणार नसल्यामुळे त्यांनी मोठ्या पवारांची साथ देण्याचे ठरवले. अनुभवी राजकारणी आणि ग्राउंड वर्क चे पुरेपूर ज्ञान असलेले म्हणून पठारे यांची ओळख आहे.

देवेंद्र फडवणीस यांची शिष्टाई आली कामी

राष्ट्रवादीने बापू पठारे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर युती मध्ये ही जागा अजित पवारांनाच मिळणार हे जवळपास निश्चित झालंच होतं पण मग जगदीश मुळीक यांचं काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर

मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जगदीश मुळीक हे त्यांची उमेदवारी अर्ज भरायला गेले होते यामुळे येथे महायुतीत बिघाडी होऊन भाजप आणि राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होते की काय असा प्रश्न सगळ्यांना काही वेळासाठी का होईना पडला होता. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या शिष्टाईने सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला. उमेदवारी अर्ज भरणार नाही अशी कबुली जगदीश मुळीक यांनी माध्यमांसमोर दिली आणि काहीसा मोकळा श्वास कार्यकर्त्यांनी घेतला.

पवार विरुद्ध पवार

लोकसभेला वडगाव शेरी ने खासदार मुरलीधर मोहोळ यांना १४ हजार २०० मतांचे मताधिक्य दिले. युती मध्ये ही जागा दुसऱ्या उमेदवाराला जाईल का अशी चर्चा होती मात्र अजित पवारांनी सुनील टिंगरे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून अजितदादांनी त्यांचं सर्वस्वपणाला लावलं हे मान्यच करावं लागेल. त्यामुळे निवडणुकीसाठी अजित पवार स्वतः जातीने या मतदारसंघात लक्ष देतील हे ही खरं.

दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी या ठिकाणी घेतलेल्या पहिल्याच सभेत विद्यमान आमदार यांचा उल्लेख "दिवट्या आमदार" म्हणून केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा हा मतदारसंघ आपल्याकडे कसा येईल यासाठी पूर्ण सज्ज आहे.

या मतदारसंघात आजपर्यंत तीन निवडणुका पार पडल्या आहेत. प्रत्येक वेळी इथून नवीन आमदार निवडुन आला आहे. यावेळी एक विद्यमान आणि एक माजी आमदार समाेरासमाेर आहेत त्यामुळे इथे "घड्याळाची" टिक टिक इथे सुरू राहील का "तुतरीचा" आवाज घुमेल हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल..

Vadgaon Sheri
Maharashtra Politics : 'मुंडे भावडांनी परळीतली जमीन बळकावली'; ऐन निवडणुकीत सांरगी महाजनांचा गंभीर आरोप, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com