मुंबई : राज्यात निवडणुकीची धामधूम शिगेला पोहचलीय. या निवडणुकीच्या धामधुमीत मुंडे-महाजन यांच्यातील जमिनीचा वाद समोर आलाय. आमदार पंकजा मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे या भावंडांवर फसवणुकीचे आरोप झालेत. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी जमीन लाटल्याचे खळबळजनक आरोप केलेत.
परळी तालुक्यातली जिरेवाडीमधली जमीन कटकारस्थान करुन पंकजा आणि धनंजय मुंडेंनी संगनमताने लुबाडली आहे. घरगड्याच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. परळी शहर पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याची तक्रार सारंगी महाजन यांनी केलीये. या आरोपांबाबत पंकजा मुंडेंशी संवाद साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
लोकसभेला पंकजा मुंडेचा पराभव झाला. आता विधानसभेला धनंजय मुंडे रिंगणात आहेत. निवडणुकीमुळे बीडमधील राजकारण तापलंय. त्यात सारंगी महाजन यांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
परळीच्या जिरेवाडीतील 63.50 गुंठे जमीन कटकारस्थान करुन बळकावली
गोविंद बालाजी मुंडेंच्या माध्यमातून धनंजय आणि पंकजा मुंडेंनी जमीन हडपली
परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार मात्र अद्यापही गुन्हा दाखल नाही
अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात 18 ऑक्टोबर 2024 रोजी दावा दाखल
प्रतिवाद्यांना नोटीस, 25 नोव्हेंबर पुढील सुनावणी
धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर सारंगी महाजन यांच्या आरोपांमुळे विरोधकांना टीकेचा आणखी एक मुद्दा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.