ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताच्या इतिहासात एकापेक्षा एक ज्ञानी माणसे झाली आहेत. त्यामधील एक म्हणजे आचार्य चाणक्य होय.
आपल्या सर्वानांच आचार्य चाणक्याच्यां जीवनाविषयी बरेच काही माहित आहे.
कोणत्याही व्यक्तीची इच्छा असेल तर तो आपले जीवन आचार्यांच्या नियमांचे पालन करुन सुंदर बनवू शकतो.
म्हणून आज जाणून घेणार आहोत की, दिवसाची सुरुवात कशी करावी जेणेकरुन घरात सुख-समृद्धीसोबतच तुमचे आरोग्य ही सुदृढ राहील.
एखादी व्यक्ती चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करते तेव्हा त्याला यशस्वी आणि समृद्ध जीवन जगण्याचे भाग्य प्राप्त होते.
सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
लवकर उठल्यामुळे तुमचं मानसिकदृष्ट्याही आरोग्य चांगलं राहतं.
चाणक्य नीतीनुसार उत्तम आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर योग आणि व्यायामासाठी थोडा वेळ काढा.
चाणक्य नीतीनुसार सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करुन झाल्यावर ध्यान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: मोबाईलला मराठीत काय म्हणतात?