सागर निकवाडे, नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातल्या राजकारणात गावित परिवाराचा नेहमीच बोलबाला राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकाच कुटूबातील चार सदस्य वेगवेगळ्या पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उभे ठाकले आहे. याचारही उमेंदवारांच्या राजकारणीची दिशा जरी वेगळी असली तरी सध्या गावित कुटुंबातील सदस्यांच्या या उमेदवारीची चर्चा जोरदार होतांना दिसून येत आहे.
स्वातंत्रपूर्व काळापासून राजकीय वारसा असलेल्या गावित कुटूबाच्या सर्वपक्षीय राजकारणाची सध्या जोरदार चर्चाही सुरु आहे. ही चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे या कुटुंबातील चार सदस्य चार वेगवगेळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाकंडून उमेदवारी करत आहे. या कुटुंबातील प्रमुख सदस्य असलेले डॉ विजयकुमार गावित 1995 पासून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून विजयी होत आहे. आणि तेव्ही पासून दोन चार वर्षाचा काळ सोडला तर मंत्री पदाची माळही त्यांच्या गळ्यात राहीली आहे. त्यामुळेच त्यांनी सत्ता केंद्रा हाती आल्यानंतर कॉग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱया या नंदुरबार जिल्ह्यात राजकीय सुरुंग लावून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थासह राजकारणात आपला वलय निर्माण केले. याच वलयातून त्यांचे कुटंबीय देखील राजकारणात येत गेले. त्याचे सर्वात लहान बंधून 2009 मध्ये नवापूर मधून आमदारही झाले. तेव्हापासूनच शरद गावित या मतदारंसघात अपक्ष उमेदवारी करत आहे. यानंतर 2014 आणि 2019 मध्ये डॉ गावित यांची कंन्या डॉ हिना गावित खासदार झाल्यात. आता तर त्यांचे आणखीन एक बंधू राजेंद्र गावित देखील शहादा मतदारसंघातून रिंगणात असून मुलगी डॉ हिना गावित ह्या देखील अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजही मतदारसंघात चारही गावितांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे दोन भाऊ आमदार असतानाच त्यांचे आणखीन एका भावाने मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याची नोकरी सोडून राजकारणा प्रवेश केला होता. सुरवातील राष्ट्रवादी, शिवसेना भाजपा असा प्रवेश करुन त्यांन देखील आता शहाद्यातून कॉग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये त्याचा या मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र त्यावेळी तीघेही भाऊ आणि आता मुलगी असे चारही मतदारसंघातले समीकरण जुळून आले आहे.
डॉ विजयकुमार गावितांचे आजोबा स्वर्गीय दामजी पोसल्या गावित हे स्वांतंत्रपूर्व काळात आमदार होते. डॉ गावितांचे काका स्वर्गीय तुकाराम हुरजी गावित हे देखील स्वातंत्रपुर्व काळात दोनदा खासदार होते. त्यांचे सासरे स्वर्गीय रमेश पान्या वळवी हे दोनदा आमदार आणि गृहराज्यमंत्री देखील राहीले आहे. तर सालक हे देखील चोपडा मतदारसंघातून आमदार होते. पक्ष कुठलाही असो नेता मात्र डॉ विजयकुमार गावित यांच्य कुटुंबातील याच राजकारणातून या कुटुंबाला राजकीय झळही सोसावी लागली. याच कुटुंबातील सदस्या आज ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य. जिल्हा परिषद अद्यक्ष, आमदार, माजी खासदार , मंत्री अशी सारीच पद उपभोगत आहे. त्यामुळे कौटूबीक मतभेद जरी असले तरीही या कुटुंबातील विधानसभेतल्या दावेदारीने राजकीय पटलवार या कुटूबाची पुन्हा चर्चा होतांना दिसून येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.