Worli Politics: वरळीत फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय; मिलिंद देवरा यांची ठाकरे गटावर टीका

Milind Deora: शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटावर पक्ष फोडाफोडीवरून टीका केलीय. उद्यापासून कोणीही कोणत्याही पक्षावर फोडाफोडीचे आरोप करू नयेत, असं देवरा म्हणालेत.
Worli Politics: वरळीत फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय; मिलिंद देवरा यांची ठाकरे गटावर टीका
Milind Deora
Published On

पराभव समोर दिसताना आज ठाकरे गटाने आमचा पक्ष फोडला. वरळीत फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. उद्यापासून कोणत्याही पक्षावर फोडाफोडीचा आरोप लावू नका, अशी टीका शिंदे गट शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी केलीय. ऐन निवडणुकीच्या काळात वरळी विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेला धक्का बसला. वरळीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेचे संदीप देशपांडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचे आव्हान आहे.

आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी शिंदे गट आणि मनसेकडून जोरदार तयारी केली जातेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी या मतदारसंघात मोठी ताकद लावलीय. मात्र अशातच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. या पक्ष फोडाफोडीच्या कारणावरून शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा संतापले आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करत ठाकरे गटावर निशाणा साधलाय.

Worli Politics: वरळीत फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय; मिलिंद देवरा यांची ठाकरे गटावर टीका
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीची फिल्डिंग; वरळीचं राजकीय गणित कसंय? पाहा व्हिडिओ

शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा संतापले असून ठाकरे गटाला टोला लगावलाय. यापुढे कोणीही कोणत्याही पक्षावर फोडाफोडीचा आरोप करू नये. पराभव दिसत असल्यानेच ठाकरे गटाने आमचा पक्ष फोडल्याची टीकाही त्यांनी केली.

Worli Politics: वरळीत फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय; मिलिंद देवरा यांची ठाकरे गटावर टीका
Maharashtra Election: मी शिवसेना चोरताना तुम्ही झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

'आता फोडाफोडीचे आरोप करू नका'

वरळीत फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. पराभव समोर दिसताना आज UBT नी आमचा पक्ष फोडला. २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष फोडले, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फोडले आणि आज त्यांनी शिवसेनाही फोडली. उद्यापासून कोणत्याही पक्षावर फोडाफोडीचा आरोप लावू नका. फोडाफोडी करण्याऐवजी जर वरळीचा विकास केला असता तर आज ही वेळ आली नसती. अशा राजकारणाचा परिणाम निवडणुकीत नक्कीच होईल. UBT मोठ्या मताधिक्याने पराभूत होईल, असं मिलिंद देवरा म्हणालेत.

आदित्य ठाकरेंनी केली होती टीका

ऐन निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वरळीत मोठा धक्का बसलाय. वरळीतील शिंदे गटाच्या शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. तीन शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी निवडणूक काळात साथ सोडल्याने वरळीत शिंदे गटाला मोठा हादरा बसला. मातोश्री येथे पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती. त्यावर मिलिंद देवरा यांनी उत्तर दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com