Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीची फिल्डिंग; वरळीचं राजकीय गणित कसंय? पाहा व्हिडिओ

Aaditya Thackeray latest News : वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीने फिल्डिंग आखण्यास सुरुवात केली आहे. वरळीतील राजकारण समीकरण कसंय, जाणून घेऊयात.
आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीची फिल्डिंग; वरळीचं राजकीय गणित कसंय? पाहा व्हिडिओ
Aaditya Thackeray and CM Eknath Shindesaam tv
Published On

मुंबई : वरळी विधानसभेसाठी शिंदे गटाकडून मिलिंद देवरा लढणार असल्याची माहिती मिळतेय...मिलिंद देवरांनी सूचक ट्विट करून वरळीतून लढण्याचे संकेत दिलेयत...वरळीत सध्या आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत.यामुळे याठिकाणी तिहेरी लढत रंगण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंना पाडण्यासाठी महायुतीसह मनसेनं कंबर कसल्याचं दिसतंय पाहूया.

वरळी विधानसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र त्यांना आमदारकी लढण्यासाठी उतरवले जाण्याची चिन्हं आहेत. सध्या वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमदेवार उतरवला जात आहे. त्यामुळे वरळी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. याबाबत मिलिंद देवरांनी सूचक ट्विट केलंय.

देवरांचं सूचक ट्विट

वरळी आणि वरळीकर गेला काही काळ न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटतं. म्हणूनच आम्ही एकत्रितपणे वरळीच्या विकासाचा मार्ग भक्कम करण्यासाठी येत आहोत,त्यासाठी लवकरच आमचं व्हिजन मांडू. ता वरळीत बदल घडेल,असे सूचक ट्विट देवरा यांनी केला आहे.

दरम्यान 2019 मध्ये वरळीत काय स्थिती होती पाहूया...

वरळीचं राजकीय गणित

- 2019 मध्ये पहिल्यांदाच वरळीतून विधानसभेच्या रिंगणात

- आदित्य ठाकरेंचा 67 हजार 427 मतांनी विजय

- राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांचा पराभव

- मनसेचा उमेदवार नव्हता

आदित्य ठाकरे यांनी 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. मात्र यावेळी त्यांना घेरण्याची तयारी महायुती आणि मनसेने केल्याचं दिसत आहे.

ठाकरेंसाठी अडचण का?

- वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे रिंगणात

- मनसेकडून सरचिटणीस संदीप देशपांडे मैदानात

- महायुतीतून मिलिंद देवरांना संधी मिळण्याची शक्यता

- मराठी मतांच्या विभाजनाचा ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता

- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला वरळीतून केवळ 6700 मतांची आघाडी

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतायत. त्यांची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे काका उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा सुरूवातीला रंगली होती. मात्र ठाकरे गटानं उमेदवारी दिल्यामुळे मनसेनंही वरळीत आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. मात्र मनसे आणि ठाकरे गटाच्या लढाईत देवरा बाजी तर मारणार नाहीत ना याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com