Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीने डाव टाकला! वरळी विधानसभेसाठी भाजपचा चेहरा ठरला?

Maharashtra Assembly Election 2024: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे. वरळी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत आहे.
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीने डाव टाकला! वरळी विधानसभेसाठी भाजपचा चेहरा ठरला?
Aditya ThackeraySaam tv
Published On

वैदेही कानेकर, मुंबई

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून अनेक दिग्गज नेते विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. अशातच आता वरळी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे.

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीने डाव टाकला! वरळी विधानसभेसाठी भाजपचा चेहरा ठरला?
Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आव्हान, म्हणाले...

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती कूणाला उमेदवारी देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अशातच हायप्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.

वरळी विधान सभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध भाजपा नेत्या शायना एन सी असा हायप्रोफाईल सामना होणार असल्याची शक्यता आहे. शायना एन सी या भाजपच्या नेत्या आहेत. तसेच व्यावसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत. शायना एन सी यांचे वडिल नाना चूडासामा हे मुंबई शहराचे माजी शेरीफ होते. वरळी विधान सभा मतदारसंघ हा हायप्रोफाईल मतदारसंघ आहे.

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीने डाव टाकला! वरळी विधानसभेसाठी भाजपचा चेहरा ठरला?
Maharashtra Politics: भाजपमध्ये अंतर्गत वाद शिगेला! चिंचवड, खडकवासल्यात विद्यमान आमदारांंच्या उमेदवारीला विरोध; नगरसेवक एकवटले

वरळी विधानसभा मतदारसंघात बीडीडी चाळी, डिलाईल रोड बीआयटी चाळी, जीजामाता नगर झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा तसेच वरळी सी फेस विभागातील अनेक हायराईज टॅावर ही उच्चभ्रू नागरिकांचे निवासस्थान देखील आहेत. दरम्यान, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शायना एन सी यांची उमेदवार म्हणून चाचपणी करताना महायुतीच्या नेत्यांनी सर्वकष विचार करून त्यांची निवड करत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीने डाव टाकला! वरळी विधानसभेसाठी भाजपचा चेहरा ठरला?
MVA seat Sharing : मविआत मित्रपक्षांची 40 जागांची मागणी? कोणत्या पक्षाला कुठली जागा हवीय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com