Maharashtra Politics: भाजपमध्ये अंतर्गत वाद शिगेला! चिंचवड, खडकवासल्यात विद्यमान आमदारांंच्या उमेदवारीला विरोध; नगरसेवक एकवटले

Maharashtra Politics Assembly Election: एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपाची लगबग सुरु असतानाच भाजपच्या विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत विरोध पाहायला मिळत आहे.
Maharashtra Politics: भाजपमध्ये अंतर्गत वाद शिगेला! चिंचवड, खडकवासल्यात विद्यमान आमदारांंच्या उमेदवारीला विरोध; नगरसेवक एकवटले
Maharashtra Politics Assembly Election:Saamtv
Published On

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपाची लगबग सुरु असतानाच भाजपच्या विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत विरोध पाहायला मिळत आहे. चिंचवड विधानसभेतील जगताप कुटुंबीयांच्या घराणेशाही विरोधात भारतीय जनता पक्षातील माजी नगरसेवक एकवटले आहेत. चिंचवड विधानसभा निवडणुकीत जगताप कुटुंबीयाना भाजपकडून उमेदवारी देण्यास भाजपच्यात काही माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे.

Maharashtra Politics: भाजपमध्ये अंतर्गत वाद शिगेला! चिंचवड, खडकवासल्यात विद्यमान आमदारांंच्या उमेदवारीला विरोध; नगरसेवक एकवटले
Maharashtra Politics: साताऱ्यानंतर मराठवाड्यातही अजित पवारांचं टेन्शन वाढलं, आणखी एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर

चिंचवड विधानसभेत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपकडून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आणि त्या सध्या विधानसभेवर चिंचवड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अश्विनी जगताप किंवा त्यांचे दीर शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मात्र भाजपच्याच काही माजी नगरसेवकांनी बैठक घेत, चिंचवड विधानसभा क्षेत्रातील जगताप कुटुंबीयांच्या घराणेशाहीला विरोध केला आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्रात भाजपकडे भरपूर इच्छुक उमेदवार असून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी काही माजी नगरसेवक करत आहेत. यात भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, शत्रुघन काटे, राम वाकडकर आणि माधुरी कुलकर्णी अशा काही प्रमुख नगरसेवकाचा विरोध आहे.

Maharashtra Politics: भाजपमध्ये अंतर्गत वाद शिगेला! चिंचवड, खडकवासल्यात विद्यमान आमदारांंच्या उमेदवारीला विरोध; नगरसेवक एकवटले
Sindhudurg Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची केली हत्या; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धक्कादायक घटना

दुसरीकडे काल पुण्यात आठही विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत खडकवासल्यात उमेदवार बदला अशी मागणी १० नगरसेवकांनी केली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत भाजपने यावेळी उमेदवार बदलला पाहिजे, तरच ही जागा आपण जिंकू अशी मागणी काही माजी नगरसेवकांनी केली. त्यातील काही इच्छुकांनी आमच्या पैकी कोणालाही उमेदवारी द्या,आम्ही पूर्ण ताकदीने काम करू असे सांगितले. तर काहींनी पक्ष जो उमेदवार देईल त्यांचे काम करू असे सांगितले. दरम्यान पक्षाच्या नेत्यांची या माजी नगरसेवकांची मते ऐकून घेऊन तुमच्या भावना पुढे कळवू असे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com