Maharashtra MLC Election: विधानसभा झालं आता परिषदेसाठी रस्सीखेच, आमदारकीसाठी नेत्यांची फिल्डिंग

MLC Election: विधानसभा निवडणुकीत एकूण 9 विधान परिषद आणि 1 राज्यसभा सदस्य रिंगणात होते. विजयी झालेले 5 विधानपरिषदेचे आमदार हे महायुतीतील आहेत.
Maharashtra MLC Election
Maharashtra MLC Electionsaam tv
Published On

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 5 विधान परिषदेचे सदस्य विजयी झाले असून, राज्यपाल कोट्यातील 5 विधानपरिषद जागा अद्याप रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये विधान परिषद सदस्यत्वासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत एकूण 9 विधान परिषद आणि 1 राज्यसभा सदस्य रिंगणात होते. विजयी झालेले 5 विधानपरिषदेचे आमदार हे महायुतीतील आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), भाजपचे प्रविण दटके (नागपूर मध्य), भाजपचे गोपीचंद पडळकर (जत), शिवसेनेचे आमश्या पाडवी ( अक्कलकुवा) आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे राजेश विटेकर (पाथरी) यांनी विजय मिळवला आहे.

या जागांवर पराभूत झाले होते उमेदवार

पराभूत विधान परिषद आमदारांमध्ये भाजपचे राम शिंदे (कर्जत-जामखेड) हे राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून, शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड) या काँग्रेसचे अमित जनक यांच्याकडून, राष्ट्रवादीचे म्हणजेच महायुतीचे शशिकांत शिंदे (कोरेगाव) हे शिवसेनेचे महेश शिंदे यांच्याकडून, तर महायुतीचे सतीश चव्हाण (गंगापूर) हे भाजपचे प्रशांत बंब यांच्याकडून पराभूत झाले आहेत.

Maharashtra MLC Election
Eknath Shinde : सत्तास्थापनेसाठी दिल्लीत महाबैठक, एकनाथ शिंदेंच्या अमित शाहांकडे ४ मागण्या

भावना गवळी या 2030 पर्यंत विधान परिषदेच्या सदस्य राहतील, तर शशिकांत शिंदे आणि सतीश चव्हाण यांचा कार्यकाळ 2026 पर्यंतचा आहे. राम शिंदे यांचा कार्यकाळ 2028 पर्यंतचा आहे. राज्यात विधान परिषदेच्या 78 जागांपैकी 31 सदस्यांची निवड आमदारांमार्फत, 21 सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे, 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून, तर 7 जागांची निवड मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती येथील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतून केली जाते.

Maharashtra MLC Election
Maharashtra CM : मोठी बातमी! मुख्यमंत्रिपदाची घोषणा लांबणीवर, मुंबईतील बैठक रद्द

राजकीय विश्लेषकांच्या मते, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही इच्छुकांसाठी विधान परिषद हा "बॅकडोअर एन्ट्री"चा मार्ग ठरू शकतो. त्यामुळे या जागांसाठी लॉबिंगची तीव्रता वाढली आहे. विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणूकांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे.

अनेक उमेदवार ज्यांचा विधानसभेच्या निवडणूकीत पराभव झाला ते विधानपरिषदेच्या निवडणूकीत आपले नशीब आजमावू शकते. मागच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत नागपूरात भाजपाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवाराने धोबीपछाड दिला होता. त्यामुळे यंदा या जागेकडेही विशेष लक्ष असणार आहे. 

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com