Maharashtra CM : मोठी बातमी! मुख्यमंत्रिपदाची घोषणा लांबणीवर, मुंबईतील बैठक रद्द

Maharashtra New CM : विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस होतील, पण अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर मिळाले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेय. राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल, याचं उत्तर ४८ तासांत मिळेल.
Eknath Shinde,
Devendra Fadanaivis, Ajit Pawar Mahayuti leader
Mahayuti Saam Tv
Published On

Maharashtra Government formation news update : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे समजण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहाली लागेल, असं दिसतेय. कारण, मुंबईमध्ये महायुतीची आज होणारी बैठक रद्द झाली आहे. मुंबईमधील बैठकीत मुख्यमंत्रि‍पदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता होती. त्याशिवाय कोणाला कोणतं मंत्रीपद दिले जाणार? हेही निश्चित होणार होतं. महायुतीमधील मुख्यमंत्रि‍पदाची पेच आणखी वाढला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत होणारी बैठक रद्द झाली आहे. आज होणारी बैठक 2 दिवसांनी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर शिवसेना आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आळी आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल रात्री अमित शाह यांच्याकडे प्रस्ताव दिले होते. त्या प्रस्तावावर विचार करून अमित शाह हे या दोन्ही नेत्यांना फोन करणार होते. त्या फोन नंतर राज्यातील तीन नेते एकत्र बसून निर्णय घेणार होते. मात्र अद्यापपर्यंत फोन न आल्याने बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जातेय. आता ही बैठक 2 दिवसानंतर होईल अशी चर्चा आहे.

Eknath Shinde,
Devendra Fadanaivis, Ajit Pawar Mahayuti leader
Eknath Shinde : सत्तास्थापनेसाठी दिल्लीत महाबैठक, एकनाथ शिंदेंच्या अमित शाहांकडे ४ मागण्या

दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात घडामोडींना येणार वेग

महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी येत्या २ दिवसात अनेक आमदार, नेते मुंबईत वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या मंत्रिपदासाठी महायुतीमधील अनेकांचे लॉबिंग सुरू झालेय. मुख्यमंत्री पद सोडून इतर मंत्रिपदं मिळावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

Eknath Shinde,
Devendra Fadanaivis, Ajit Pawar Mahayuti leader
Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, दिल्लीचा ग्रीन सिग्नल, अधिकृत घोषणा आज होणार, सूत्रांची माहिती

कोणाला कुठल्या मंत्रिपदाची अपेक्षा

भाजप: गृह, ग्रामविकास, महसूल, सामान्य प्रशासन, गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम

राष्ट्रवादी काँग्रेस: अर्थ, महिला व बालकल्याण, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास

शिवसेना: गृह, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, नगरविकास, आरोग्य, सांस्कृतिक, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क

Eknath Shinde,
Devendra Fadanaivis, Ajit Pawar Mahayuti leader
Maharashtra CM : एकनाथ शिंदे नाराज? दिल्लीतल्या फोटोनं चर्चेला उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com