Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, दिल्लीचा ग्रीन सिग्नल, अधिकृत घोषणा आज होणार, सूत्रांची माहिती

Maharashtra Government Formation : मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवल्याचे समोर आलेय. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम पाहावे, असेही सांगण्यात आल्याचे कळतेय. आज याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस
Devendra FadnavisSaam Tv
Published On

Devendra fadnavis, Maharashtra CM : अमित शाह यांच्यासोबत गुरुवारी दिल्लीमध्ये महाबैठक पार पडली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अमित शाह यांनी खातेवाटप अन् मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यावर चर्चा झाली. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीची माहिती गुलदस्त्यात होता. आज मुंबईमध्ये होणार्‍या बैठकीमध्ये याला अंतिम स्वरुप मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव फायनल झाल्याची माहिती मिळत आहे. अधिकृत माहिती आज जाहीर होऊ शकते.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री राहणार?

महायुतीच्या सराकरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहावे, असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाने केल्याचं समजतेय. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही, हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्याचा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आलाय. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेय.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra Politics : शिंदेंची कोंडी? भाजप गृह खातं स्वत:कडेच ठेवणार, नगरविकास खात्यावरही ठोकला दावा

फॉर्म्युला काय ठरला ?

खातेवाटपावर दिल्लीमध्ये खलबतं झाले. अडीच तास शिर्ष नेतृत्वामध्ये खातेवाटपावर चर्चा झाली. मंत्रि‍पदाचा फॉर्म्युलाही ठरला, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला सर्वाधिक मंत्रिपदे मिळतील. भाजप २० ते २२ मंत्रिपदे आपल्याकडे ठेवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांना १०-१२ मंत्रिपदे मिळतील. अजित पवार यांना ८-९ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra politics : कोण कोणती मंत्रिपदे? शिंदेंनी अमित शाहांना मनातलं सगळं सांगितलं

मुख्यमंत्री ठरला, गृहमंत्रालयावरुन घोडं अडलं?

महायुतीमध्ये भाजपकडे सर्वाधिक जागा आहेत, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल, याच शंकाच नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाकडून याला दुजोरा देण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर मलाईदार खात्यावर दावा ठोकलाय. शिंदेंनी खासकरुन गृह खात्यावर दावा ठोकलाय. पण भाजपकडून देण्यास नकार देण्यात आलाय. आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे, त्यानंतर खातेवाटप अन् मुख्यमंत्र्‍यांच्या नावाची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com