Maharashtra politics : कोण कोणती मंत्रिपदे? शिंदेंनी अमित शाहांना मनातलं सगळं सांगितलं

Maharashtra Government Formation : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला, पण त्यांनी मलाईदार खात्यांची मागणी केल्याचं समजतेय. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत एकनात शिंदे यांनी अमित शाह यांना मनातलं सगळं बोलून दाखवलेय.
Maharashtra Politics:
Eknath Shinde NewsTwitter
Published On

Eknath Shinde Meeting With Amit Shah in delhi : महायुतीच्या सत्तास्थापनेच्या वाटाघाटीची गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये चर्चा झाली. अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत चर्चा केली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत गुरुवारी रात्री अडीच तास दिल्लीच्या नेतृत्वाची चर्चा झाली. यामध्ये मंत्रिपदे, खातेवाटप, पालकमंत्रिपदावर चर्चा झाल्याचं समजतेय. या बैठकीआधीच एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्येही एक छोटेशी बैठक झाली. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे आपली मागणी ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी मंत्रीपद आणि पालकमंत्रिपदासोबत इतर अनेक बाबींचा उलगडा केल्याचं समजतेय.

एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासमोर काय भूमिका मांडली ?

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून १२ मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणी करण्यात आली. त्यासोबतच विधान परिषदेच्या सभापतीपदाची देखील बैठकीत शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली.

Maharashtra Politics:
Maharashtra CM : एकनाथ शिंदे नाराज? दिल्लीतल्या फोटोनं चर्चेला उधाण

मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी शिंदेंनी अमित शाहांना विनंती केली. महायुती म्हणून शिवसेनासोबत असल्याचं देखील पुन्हा एकदा शिंदेंनी अमित शाह यांना शब्द दिलाय. दरम्यान, शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Maharashtra Politics:
Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम, अधिकृत घोषणा कधी होणार?

मी सगळ्याची काळजी घ्यायला आहे - एकनाथ शिंदे

केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सकारात्मक बैठक झाली. आता उद्या पुन्हा मुंबईत बैठक होईल. बुधवारीच माझी भूमिका मी जाहीर केली. सगळं संपवू नका लगेच. मुंबईत होणाऱ्या बैठकीत सगळं काही ठरणार आहे. सरकार स्थापनेवर चर्चा झाली आहे. आमच्यात समन्वय आहे. आम्ही सकारात्मक आहोत. काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे सगळ्यांची काळजी मी घेतोय.

Maharashtra Politics:
Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार की भाजप धक्कातंत्र वापरणार? दिल्लीत ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com