Maharashtra Politics : नवरी पसंत, पण नवरदेवाला हुंडा पाहिजे; शपथविधीवरून रोहित पवारांचा महायुतीला अप्रत्यक्ष टोला

rohit pawar news : सत्तास्थापनेवरून रोहित पवार यांनी महायुतीला टोला लगावला आहे. नवरा आणि नवरीचं उदाहरण देऊन रोहित पवार यांनी टीका केली आहे.
Rohit Pawar news
Rohit Pawar Mla Saam Tv
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेची हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्तावाटपावर बैठकांचा सपाटा सुरु होता. त्यानंतर काल शनिवारी भाजपने शपथविधीचा तारीख जाहीर केली. मात्र, तरीही सत्तावाटपातील मु्ख्यमंत्री शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा आहे. यावरून रोहित पवार यांनी महायुतीला लक्ष्य केलं आहे. 'नवरी पसंत आहे. पण नवरदेवाला हुंडा पाहिजे, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांनी जाहीर आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला आमदार रोहित पवार,खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार यांनी सत्ता स्थापनेला होणाऱ्या विलंबावरून महायुतीला टोला लगावला आहे. भाजपने शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. याबाबत बोलताना रोहित पवारांनी महायुतीवर टीका केली.

Rohit Pawar news
Eknath Shinde: श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर

'२६ तारखेला सर्व पार पाडायचं होतं. त्यानंतर २९ तारीख आली. पुढे २ तारीख आली. आता ५ तारीख फायनल झाली आहे. आता हे म्हणजे असं झालं आहे. नवरदेवाला नवरी पसंत आहे. लग्न ठरलं आहे. पण लग्नाची तारीख आली. आता नवरदेव रुसून बसला आहे की, मला हुंडा पाहिजे म्हणजेच मला पद पाहिजे, असी महायुतीची अवस्था झाली आहे, अशा शब्दात रोहित पवारांनी महायुतीवर तोफ डागली.

Rohit Pawar news
Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट! श्रीकांत शिंदे अचानक दरे गावात पोहचले

ईव्हीएम मशीनवर बोलताना शरद पवार म्हणाले, 'शरद पवार पक्षाच्या वतीने ईव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडे मागणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयुक्ताला सांगितले होते की, मॉक करायचा नाही. जिथं मतदान झाले, त्यातीलच एक ईव्हीएम घ्यायचं आणि त्याचं रिटेंशटिंग करायचं'.

Rohit Pawar news
Mahayuti News : महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख, ठिकाण आणि वेळही ठरली; पण मुख्यमंत्री कोण होणार?

'रिटेंशटिंगपेक्षा व्हीव्हीपॅट तिथं मोजायचे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. पण तिथं इलेक्शन कमिशनने वेगळेच केलं ,असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांची भेट घेऊ. जर त्यांनी ऐकलं नाही, तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याच देखील रोहित पवार म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com