Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट! श्रीकांत शिंदे अचानक दरे गावात पोहचले

Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या. शिंदेंना १०५ डिग्री इतका ताप आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजतेय.
eknath shinde news
Eknath Shinde Health Updatetwitter
Published On

Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आज ते दरे गावातून मुंबईला येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर सत्ता स्थापनेची कोंडी फुटणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठ दिवस होऊन गेले, तरीही राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यातच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा गेला. दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांची बैठक पार पडली. दोन दिवसांखाली मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार होती, पण एकनाथ शिंदे अचानक दरे गावाला निघून गेले, त्यामुळे चर्चेला उधाण आले. दरे गावात गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रकृती बिघडल्याची माहितीही पुढे आली होती. शनिवारी एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्याशिवाय अंगात कणकणी भरल्याचेही समोर आले होते. दीपक केसरकर त्यांना भेटण्यासाठी दरे गावात पोहचले, पण न भेटताच गेटवरून माघारी परतले. रात्रीच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही दरे गाव गाठले.

आता मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आता माघारी परतणार आहेत. त्यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. खासदार श्रीकांत शिंदेही रात्री दरे येथे दाखल झाले आहेत. आज ते मुंबईला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दरे गावातून मुंबईला परतल्यानंतर सत्तेची कोंडी सुटणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीमधील बैठक झाल्यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील दोन दिवसांपासून साताऱ्यातील दरेगावी मुक्कामाला आहेत. एकनाथ शिंदे दरेगावात गेल्याने महायुतीची बैठक देखील रद्द झाली आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे की नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेदरम्यान आता एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. त्यातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने नवी चर्चा सुरु झाली. मोठा निर्णय घेण्याआधी एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी जातात, असे शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? महायुतीची सत्तास्थापनेची कोंडी फूटणार का? या चर्चा महाराष्ट्रात सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com