Bird Flu : मोठी बातमी! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी, कुठे लागू केला आहे हा निर्णय?

Nandurbar Bird Flu Crisis : नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनाने चिकन आणि अंडी विक्रीवर तात्काळ बंदी घातली आहे. हजारो पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले असून पोल्ट्री व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
BIRD FLU OUTBREAK IN NAVAPUR: CHICKEN AND EGG SALES BANNED, HUGE POULTRY LOSSES
BIRD FLU OUTBREAK IN NAVAPUR: CHICKEN AND EGG SALES BANNED, HUGE POULTRY LOSSESSaam Tv
Published On
Summary
  • नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला

  • चिकन व अंडी विक्रीवर तात्काळ बंदी

  • ४४ हजार पक्ष्यांचे कलिंग; मोठ्या प्रमाणात नुकसान

  • पोल्ट्री व्यवसायाला कोट्यवधींचा फटका

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील चिकन दुकाने, बिर्याणी सेंटर्स तसेच अंडी विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. नवापूर नगरपरिषदेने दिलेल्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. अवघ्या दोन दिवसांत सुमारे 44 हजार पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले असून, एकूण 1 लाख 40 हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेसाठी सुमारे 50 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक दिवस-रात्र कार्यरत असून, संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

BIRD FLU OUTBREAK IN NAVAPUR: CHICKEN AND EGG SALES BANNED, HUGE POULTRY LOSSES
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. दररोज सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय, 20 हजार अंडी आणि तब्बल 44 टन पशुखाद्यही नष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे कंबरडे मोडले असून, अनेकांच्या उपजीविकेवर संकट आले आहे.

BIRD FLU OUTBREAK IN NAVAPUR: CHICKEN AND EGG SALES BANNED, HUGE POULTRY LOSSES
Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

चिकन विक्रेते आणि बिर्याणी सेंटर चालकांना या बंदीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. अचानक लागलेल्या निर्बंधांमुळे त्यांचा साठा वाया गेला असून, व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. दुसरीकडे, चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी आल्यामुळे मांसाहार प्रेमींमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सहकार्याचीही आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com