Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Bharat Jadhav

साल्मोनेलाचा धोका

अमेरिकेसारख्या देशांमध्ये अंडी धुण्यामुळे त्यांचा नैसर्गिक संरक्षणात्मक थर निघून जातो. यामुळे साल्मोनेला बॅक्टेरिया अंड्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असते.

अंडी रेफ्रिजरेटरमध्ये का ठेवावे?

बॅक्टेरियाला टाळण्यासाठी अंडी बॉक्समधून काढून टाकल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक आहे.

भारतातील फंडाच वेगळा

भारतात अंडी सहसा न धुता विकली जातात, म्हणून येथे रेफ्रिजरेशन अनिवार्य नाहीये.

तापमानातील स्थिरता

रेफ्रिजरेटरमध्ये तापमान स्थिर आणि थंड राहते. तर बाहेरील वातावरणातील तापमानात चढउतार होत असते, त्यामुळे अंडी लवकर खराब होऊ शकतात.

शेल्फ लाइफ वाढते

अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते ५-६ आठवडे ताजी राहू शकतात. तर खोलीच्या तापमानात अंडी १-३ आठवडे टिकू शकतात.

रेफ्रिजरेटरमध्ये अंडी कुठे ठेवाल?

रेफ्रिजरेटरचा दरवाजा वारंवार उघडला जात असतो. त्यामुळे तापमानात सतत बदल होत राहतो. यामुळे अंडी लवकर खराब होऊ शकतात.

रेफ्रिजरेटरमध्ये अंडी कशी साठवायची?

अंडी त्यांच्या मूळ ट्रे किंवा कंटेनरमध्ये ठेवा. हे त्यांचे बाहेरील धूळ आणि बॅक्टेरियापासून संरक्षण देईल.

खोलीच्या तापमानात ठेवा अंडी

जर अंडी लवकरच खाल्ली जाणार असतील आणि धुतली गेली नसतील तर अंडी थंड, कोरड्या आणि कमी उजेड असलेल्या ठिकाणी ठेवा.

हेही वाचा

येथे क्लिक करा

महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना जमीन विकता येते का?