नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारची मंजुरी! कुठून कुठे धावणार? कसा आहे नवा मार्ग?

Nashik Pune High-Speed Railway New Shirdi Route Details: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेच्या नव्या शिर्डी मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून नाशिकरोड-शिर्डी 95.5 किमी मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.
Nashik Pune high-speed railway new Shirdi route details
Nashik Pune high-speed railway new Shirdi route detailssaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक-पुणे बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाबाबत एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने राजपत्र (Gazette) अधिसूचना जारी करत नाशिक-पुणे रेल्वेच्या नव्या शिर्डी मार्गाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयासोबतच नाशिकरोड ते साईनगरी शिर्डी दरम्यानच्या 95.5 किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे. कित्येक वर्षांपासून रखडेलेल्या या प्रकल्पाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र, आता ही रेल्वे संगमनेरमार्गे नाही तर शिर्डीमार्गे जाणार असल्याने मोठा वाद होण्याची देखील शक्यता आहे.

Nashik Pune high-speed railway new Shirdi route details
Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

पूर्वी प्रस्तावित असलेल्या संगमनेर-नारायणगाव मार्गाऐवजी आता ही रेल्वे नाशिक-सिन्नर-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर मार्गे धावणार असल्याचे केंद्र सरकारच्या अधिसूचनेमुळे स्पष्ट झाले आहे. हा नवीन शिर्डी प्रकल्प सुमारे 8 हजार 970 कोटी रुपयांचा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चात मोठी बचत करण्याच्या उद्देशाने हा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी डॉ.अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असतानाच केंद्राकडून ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Nashik Pune high-speed railway new Shirdi route details
बदलापूरकरांची ट्रॅफिक जाममधून होणार सुटका; नवीन रेल्वे भुयारी मार्ग बांधणार

बाधित शेतकऱ्यांना आक्षेपासाठी 30 दिवसांची मुदत

या नवीन अधिसूचनेमुळे बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आपले लेखी आक्षेप नोंदवता येणार आहेत.

Nashik Pune high-speed railway new Shirdi route details
Pune Traffic: पुणेकरांसाठी मोठी बातमी! वाहतुकीत होणार मोठा बदल, काय आहे कारण? जाणून घ्या पर्यायी मार्ग

संगमनेर भागातील शेतकरी पेचात

दरम्यान या नव्या निर्णयामुळे पूर्वीच्या संगमनेर मार्गावरील शेतकरी मात्र मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जुन्या प्रस्तावित मार्गावरील जमिनींच्या 7/12 उताऱ्यांवर आधीच महारेलचे नाव नोंदवले गेले आहे. आता मार्ग बदलल्यामुळे या नोंदीचे काय होणार आणि जमिनींचा ताबा कधी मोकळा होणार, या चिंतेत शेतकरी पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com