Pune Traffic: पुणेकरांसाठी मोठी बातमी! वाहतुकीत होणार मोठा बदल, काय आहे कारण? जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Traffic Police : पुण्यात ११ ऑगस्टला तिरंगा रॅली होणार असून दुपारी २ नंतर काही मार्गांवरील वाहतूक वळवली जाणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Pune Traffic Police
Pune Trafficmeta ai
Published On

Pune: पुण्यात उद्या ११ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. नागरकिरांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरच्या ललित महल हॉटेल चौक ते ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि पुढे गरवारे चौक असा रॅलीचा मार्ग असणार आहे. रॅलीच्या वेळी गर्दी आणि वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन दुपारी २ वाजल्यानंतर आवश्यकतेनुसार वाहतूक वळवली जाणार आहे.

Pune Traffic Police
Home Loan वर मोठा दिलासा! 65 महिन्यांसाठी व्याजदर लॉक, 'या' बँकेची भन्नाट ऑफर,खास योजना काय?

खंडोजीबाबा चौक ते गरेवारे चौक वाहतुकीत बदल

खंडोजीबाबा चौक ते गरेवारे चौक मार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. तर स्वारगेटहून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौक, अण्णाभाऊ चौर, सेनादत्त चौक, म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि लॉ कॉलेज रोड या पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे.

तसेच स्वारगेट ते खिडकी किंवा जुन्या पुणे - मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांनी अण्णाभाऊ साठे चौक, पूरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केलं आहे.

Pune Traffic Police
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! बेसिक सॅलरी ₹52,600 होणार? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन

खंडोजीबाबा चौकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी नळ स्टॉप, पौड फाटा, आठवले चौक आणि लॉ कॉलेज रोडच्या पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना आहे. अलका टॉकीज चौकाकडून येणार्‍या वाहनांनी केळकर रस्ता, नदीपात्र, शनिवारवाडा आणि गाडगीळ पुतळा मार्गाचा वापर करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com