राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: नागपूर महापालिकेत भाजपकडून १०२ नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
BJP leaders during a meeting with newly elected corporators in Nagpur Municipal Corporation.
BJP leaders during a meeting with newly elected corporators in Nagpur Municipal Corporation.Saam Tv
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महापालिका निवडणुकीत आताच निवडून आलेल्या 102 नगरसेवकांचे भाजपने राजीनामे घेतले. नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत पक्षाने राजीनामे घेतल्याने एकच खळबळ उडाली.

BJP leaders during a meeting with newly elected corporators in Nagpur Municipal Corporation.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? पक्षाचे वरिष्ठ नेते एकाच नावावर ठाम

निवडणुकीचे निकाल लागताच देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले. तसेच नितीन गडकरी हे लोकसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याने भाजपच्या कोअर कामिटीची बैठक पुढे ढकलली जात होती. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नरेंद्र बोरकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबईला पाठवण्यात आला. तिकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी रजवाडा पॅलेस येथे पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली. त्या बैठकीत गटनेते म्हणून बोरकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.

BJP leaders during a meeting with newly elected corporators in Nagpur Municipal Corporation.
Maharashtra Politics: तेराव्या दिवसानंतर गौप्यस्फोट करणार; पवार कुटुंबियातील बड्या नेत्याचा सूचक इशारा

याच बैठकीत सर्व नगरसेवकांना एक कागद देऊन त्यावर सही करायला सांगितली. तो कागद बघून नव्या नगरसेवकांना घामच फुटला. निवडून येऊन काही दिवसच झाले आणि महापालिकेची पायरी ही अजून ओलांडली नाही आणि पक्ष राजीनामा घेत आहेत. मात्र ही पक्षाची पद्धत असल्याचे सांगितल्याने सर्व नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

BJP leaders during a meeting with newly elected corporators in Nagpur Municipal Corporation.
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? सुमारे 1 लाख कोटी, 14 महत्वाचे ठळक मुद्दे

गतवेळीप्रमाणे भाजपने सर्व १०२ नगरसेवकांकडून राजीनामापत्र लिहून घेतले आहे. पक्ष विरोधी कारवाई किंवा इतर अनुचित प्रकारात कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आल्याची माहिती आहे. गटनेते बोरकर यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांनी राजीनामे लिहून दिले आहेत. हा पक्षाअंतर्गत आचारसंहितेचा एक भाग असल्याचे बोरकर यांनी स्पष्ट केले. शहरातील नागरिकांनी दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com