दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत, भाजप नेते पीयूष गोयलांचा मोठा दावा, शरद पवारांवरही वक्तव्य

BJP reaction to Sharad Pawar Ajit Pawar unity talks : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधीच एकत्र येणार नाहीत, असा मोठा दावा भाजप नेते पीयूष गोयल यांनी केला आहे. शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत, भाजप नेते पीयूष गोयलांचा मोठा दावा, शरद पवारांवरही वक्तव्य
Published On

Maharashtra Politics Latest Marathi news : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडून थेट प्रतिक्रिया देणं शनिवारी टाळलं. पण आता भाजप नेते पीयूष गोयल यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधीच एकत्र येणार नाहीत, असा दावा केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पीयूष गोयल यांनी दोन मोठी विधानं केली. त्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कधीच एकत्र येणार नाही, असे म्हणाले. त्याशिवाय प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहितीही दिली. गोयल यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा एकदा वादळ उठलेय.

२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची इच्छा होती असा दावा केला जातोय. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याला खंड पडला, असे शरद पवार म्हणाले. या सर्व घडामोडी सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत, भाजप नेते पीयूष गोयलांचा मोठा दावा, शरद पवारांवरही वक्तव्य
Praful Patel : प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती, भाजपच्या पियुष गोयल यांची घोषणा, राजकारणात खळबळ

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पीयूष गोयल यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले की, 'अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात महायुती सरकारचा भाग म्हणून चांगली कामगिरी केली आहे. 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असे मला वैयक्तिकरित्या वाटत नसल्याचेही यावेळी गोयल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आधी अजित पवार यांच्यासोबत होते, आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहे, असे गोयल म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असे विधानही यावेळी त्यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांना राष्ट्रवादीत सामील होण्यासाठी आमंत्रित दिले जाईल असे मला वाटत नाही, कारण त्यांनी जनतेचा विश्वास आणि मते गमावली आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत, भाजप नेते पीयूष गोयलांचा मोठा दावा, शरद पवारांवरही वक्तव्य
Pune : पुणे पोलीस दलात हळहळ, बड्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, मध्यरात्री काळाचा घाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com