Pune : पुणे पोलीस दलात हळहळ, बड्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, मध्यरात्री काळाचा घाला

Pune police officer death news : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
Pune police officer death news
Pune police officer death newsSaam TV Marathi News
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Lonikand police inspector Sarjerao Kumbhar death news : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अत्यंत शांत, संयमी आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभार यांच्या जाण्याने पोलीस दलासह सर्वसामान्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सिद्धेश आणि मुलगी सिद्धी सध्या शिक्षण घेत आहेत. सिद्धी ही बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत असून वडिलांच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत कुंभार पोलीस ठाण्यात आपली ड्युटी चोख पार पाडून वडगावशेरी येथील घरी परतले होते. मात्र, मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील चावरे या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सध्या वडगावशेरी येथे राहत होते.

Pune police officer death news
Salon Rate Hike: खिशाला कात्री! आता दाढी-कटिंगसाठी मोजावे लागणार जादा पैसे; जाणून घ्या नवीन दरपत्रक

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे नियोजन त्यांनी सलग दोन वर्षे अतिशय सुरक्षितपणे हाताळले होते. नुकतेच २५ ते २७ जानेवारी दरम्यान त्यांच्याकडे वाघोली पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार होता. योगायोगाने याच काळात वाघोलीत दोन खुनाच्या घटना घडल्या, मात्र दबावाखाली न येता कुंभार यांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि कायदा-सुव्यवस्था राखली. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२५ मध्ये त्यांना 'सुरक्षित पुणे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Pune police officer death news
Mumbai : मुंबई हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार, चित्रपटसृष्टीत खळबळ
Pune police officer death news
NCP Reunion: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांची इच्छा; १२ तारखेला निर्णय जाहीर होणार होता, शरद पवारांचा गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com