संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Rohit Shetty’s Residence in Juhu Sends Shockwaves Across Bollywood : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर अज्ञात तरुणाने थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे फिल्मसिटीसह संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. (Rohit Shetty house firing incident in Mumbai)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हुडी घालून आलेल्या एका तरुणाने रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर तब्बल सहा राउंड फायरिंग केली. गोळीबार केल्यानंतर तो तरुण दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला. गोळीबारामुळे बंगल्याच्या खिडकीच्या काचा फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान पोलिसांना पाच रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. पोलिसांनी बंगल्याच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज आणि DVR ताब्यात घेतले असून, आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. हा गोळीबार धमकी आहे की कटकारस्थान, याचा तपास सुरू असून, रोहित शेट्टी यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या थरारक घटनेमुळे बॉलीवूड आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
रोहित शेट्टी हे त्यांच्या ॲक्शन चित्रपटांसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या या 'रिअल लाईफ' गोळीबारामुळे बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की खंडणीसाठी, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. गोळीबार करणाऱ्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर पथके रवाना केली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.