Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

22k 24k gold price today Mumbai Pune : अर्थसंकल्पाआधी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. १० तोळे सोनं ₹८६,२०० ने स्वस्त झाले असून २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी कपात झाली आहे. आजचा सोन्याचा दर वाचा.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On

Gold Price Today Mumbai Pune jalgaon India : रविवारी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, पण त्याआधीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत धडाम करत कोसळली. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति ग्रॅम ८६२ रूपयांची कपात नोंदवण्यात आली आहे, तर प्रति तोळा सोनं ८६२० रूपयांनी स्वस्त झाले आहे. १० तोळं सोनं आज सराफा बाजार उघडताच ८६ हजार २०० रूपयांनी घसरलेय. रविवारी केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत, पण त्याआधीच सोन्याच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली आहे.

अर्थसंकल्पाच्या २४ तास आधी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोनं अन् चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा बाजारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात हा निर्णय घेतला गेला तर दागिन्यांच्या किंमतीत आणखी कमी होऊ शकतात. याचा सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे.

Today Gold Rate
NCP Reunion: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांची इच्छा; १२ तारखेला निर्णय जाहीर होणार होता, शरद पवारांचा गौप्यस्फोट

२२k, २४k सोन्याची आज किंमत किती ?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १६०,७३० रुपये इतकी आहे. शुक्रवारी प्रति १० ग्रॅम १६९,३५० रुपये इतकी होती.

२२ कॅरेट सोन्याच्या किमतीत घसरण झाली. आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹१४७,३५० आहे. शुक्रवारी प्रति १० ग्रॅम ₹१५५,२५० होती.

१८ कॅरेट सोन्याची किंमतीतही घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹१२०,५९० इतकी आहे. एका दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी ही किंमत प्रति १० ग्रॅम ₹१२७,०५० होती.

Today Gold Rate
Sunetra Pawar Oath Ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहणार? शरद पवारांचं मोठं विधान

तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती?

मुंबई, पुणे, जळगावात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १६०,५८० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १४७,२०० रुपये आहे.

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १६०,७३० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १४७,३५० रुपये आहे.

जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १६०,७३० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १४७,३५० रुपये आहे.

लखनौमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १६०,७३० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १४७,३५० रुपये आहे.

कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१६०,५८० आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१४७,२०० आहे.

Today Gold Rate
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, शरद पवारांना माहितीच नाही, वाचा नेमकं काय म्हणाले....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com