गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Badlapur local accident today : बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी ऑफिसला जाताना धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात 28 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गर्दी, घाई आणि असुरक्षित प्रवासामुळे घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा लोकल प्रवासातील धोके समोर आले आहेत.
Badlapur CSMT local train
Badlapur CSMT local train
Published On

Mumbai Local Latest News Update : ऑफिसला वेळेवर जाण्यासाठी अनेकदा मुंबईकर दाटीवाटीने लोकलमध्ये चढतात अन् प्रवास करतात. मुंबईकरांच्या आयुष्यातलं हे एक 'कडू सत्य' आहे. पण ऑफिसला वेळेवर पोहोचण्याच्या धावपळीत जीवाचा धोका पत्करून प्रवास करावा लागतो. कधीकधी याच धावपळीत जीव गमावल्याच्या घटना घडतात. बदलापूरमध्ये अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. ऑफिसला जाण्याच्या गडबडीत एक महिला गर्दीत लोकल पकडायला गेली अन् घात झाला. महिला थेट धावत्या लोकलखाली गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज सकाळी आठ वाजताच्या आसपास ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरमध्ये एकच शोककळा पसरली. मृत तरूणीचे नाव चेतना असे आहे. चेतनाचा वर्षभरआधीच विवाह झाला होता. संसाराला सुरूवात झालीच होती, की काळाने घाला घातला. (Badlapur Local Train Accident)

ऑफिसला जाण्याची घाई आणि वेळेवर पोहोचण्याची ओढ एका तरुण महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना बदलापूर रेल्वे स्थानकात घडली आहे. धावती लोकल पकडण्याच्या नादात पाय घसरून रेल्वेखाली आल्याने २८ वर्षीय चेतना चंद्रशेखर देवरुखकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बदलापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतना चंद्रशेखर देवरुखकर यांच्यासोबत सकाळी 8 वाजून 11 मिनिटांची सीएसएमटी लोकल पकडताना ही दुर्दैवी घटना घडलीय. 28 वर्षीय चेतना या जुवेली येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होत्या. वर्षभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Badlapur CSMT local train
Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

चेतना या शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बदलापूर स्थानकात आल्या होत्या. सकाळी ८:११ ची सीएसएमटी लोकल फलाटावरून सुटत असताना त्यांनी ती पकडण्याचा प्रयत्न केल्याचं समजतेय. पण यादरम्यान त्यांचा तोल गेला आणि त्या थेट धावत्या ट्रेनखाली आल्या. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी म्हणजे, २८ वर्षाच्या चेतना यांचे लग्न अवघ्या वर्षभरापूर्वीच झाले होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Badlapur CSMT local train
Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

दाटीवाटीने प्रवास करताना पायऱ्यांवर लटकणे किंवा दरवाज्याजवळ उभं राहणं खूप धोकादायक असतं. धावती लोकल पडकल्यानेही अनेकदा तोल जातो. त्यामुले गंभीर जखमी अथवा मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे लोकलमधून प्रवास करताना धोका पत्कारू नका. ऑफिस अथवा इतर कामासाठी निघत असाल तर वेळेआधीच रेल्वे स्थानकावर पोहचा. त्यामुळे अपघात होणं टाळता येऊ शकते. लोकलच्या दारात उभे राहणेही टाळावे. एखादी लोकल चुकली तर दुसरी मिळेल, पण जीव पुन्हा मिळणार नाही, याचे भान प्रवाशांनी राखणे गरजेचे आहे.

Badlapur CSMT local train
Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com