

मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी
Badlapur Salon Rate Hike Update : तुम्ही जर बदलापूर शहरातील सलूनमध्ये केस कापत असाल किंवा दाढी करत असाल तर तुम्हाला जादा पैसे द्यावे लागणार आहेत. केस कापण्यासाठी 120 रुपये तर दाढी करण्यासाठी आता 60 रुपये द्यावे लागणार आहेत. कारण इथल्या वीर भाई कोतवाल नाभिक समाज सलून असोसिएशननं केस कापण्याच्या दरात वाढ केलीय. ५ वर्षांनंतर शहरातील सलून दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे यापुढे ग्राहकांना केस कापण्यासाठी 100 रुपयांऐवजी 120 रुपये द्यावे लागतील. तर दाढी करण्यासाठी 50 ऐवजी 60 रुपये मोजावे लागतील. याशिवाय फेशियल, स्टायलिस्ट केस आणि इतर बाबींमध्येही 50 ते 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दाढी आणि केस कापण्यासाठी लागणारं साहित्य तसच फेस वॉश, मसाज क्रीम, ब्लेड, जागेचं भाडं, कर्मचाऱ्यांचे पगार या सगळ्या खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचं असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलंय.
गेल्या काही वर्षात बदलापूर शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालीय. बदलापूर शहरात 300 हून अधिक सलून आहेत. याशिवाय युनिसेक्स आणि नामांकित ब्रँडच्या सलूनची संख्याही वाढलीय. त्यामुळे सर्व सामान्य सलून व्यतिरिक्त नामांकित ब्रँडच्या सलून चालकांनीही 50 ते 60 रुपयांची वाढ केली आहे. याआधी 2020 मध्ये सलून असोसिएशनच्या वतीने केस आणि दाढी कापण्याच्या दरात वाढ केली होती. कोरोनानंतर आता पहिल्यांदाच ही दरवाढ करण्यात आल्याचं असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आलय. त्यामुळे तुम्ही जर केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी सलूनमध्ये जात असाल तर वाढीव पैसे देण्याची तयारी ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.