Praful Patel : प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती, भाजपच्या पियुष गोयल यांची घोषणा, राजकारणात खळबळ

praful patel NCP Latest News : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Prafull Patel
Prafull PatelSaam Tv News
Published On

Praful Patel appointed NCP national president : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे सर्व अधिकार आता प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असतील. पक्षाचे सर्व अधिकार आता त्यांच्या हातात देण्यात आले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली कुणी? असा सवाल विचारला जात आहे. शरद पवार यांना राजकीय खेळातून दूर ठेवण्यासाठी पेटल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. पेटल यांच्या नियुक्तीची घोषणा भाजप नेत्यांकडून का केली ? असा सवाल उपस्थित होतोय.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष अपॉईंट केले गेलेत अशी माहिती दजिली होती. ते म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आज घडीला तरी शक्य नाही. उलट दादांनी पुणे-पिंपरीत महायुतीत निवडणूक लढवली असती तर ते तिथंही सत्तेत असते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत विधान केले आहे. पीटीआयचे मुख्य संपादक विजय जोशी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुलाखत घेतली.

Prafull Patel
Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

अजित पवार हयात असताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष होते. पण आता अजित पवार यांच्या निधनानंतर अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याचे समजतेय. पण पटेल यांची नियुक्ती कधी झाली? असा सवाल राजकीय स्तरातून विचारला जातोय. कारण, शनिवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली अन् त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Prafull Patel
Salon Rate Hike: खिशाला कात्री! आता दाढी-कटिंगसाठी मोजावे लागणार जादा पैसे; जाणून घ्या नवीन दरपत्रक

प्रफुल्ल पटेल अजित पवारांचा पक्ष खालसा केला जाणार का? राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये अध्यक्षांकडे पूर्ण अधिकार असतात. प्रफुल्ल पटेल यांना पक्षातील सर्वाधिकार मिळतील. पटेल यांच्या नावाची घोषणा भाजप नेत्यांकडून केली गेली, त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा, अशी घोषणा होत असतानाच पटेल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने खळबळ उडाली.

Prafull Patel
Mumbai : मुंबई हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार, चित्रपटसृष्टीत खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com