Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

Union Budget 2026 expectations and analysis : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. टॅरिफ बजेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बजेटमध्ये मेड इन इंडिया, रोजगार, करसवलत आणि महागाईवर उपाययोजना होणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
India-UK Trade Dealsaam tv
Published On

Nirmala Sitharaman ninth budget highlights : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २००६-२७ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा अर्थमंत्र्‍यांकडून देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात विकासाची गती कायम राहण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. आज होणाऱ्या बजेटला टॅरिफ बजेटही म्हटले जातेय. कारण, या अर्थसंकल्पातून भारत अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला उत्तर दिले जाणार आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार की दिलासा मिळणार, याची चर्चा सुरू आहे.

केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली जाणार की, दिलासा मिळणार याची उत्सुकता लागली आहे. काम करणारे व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी आणि मध्यमवर्गीय सर्वजणाचे आजच्या बजेटकडे लक्ष लागलेय. वाढती महागाई आणि दैनंदिन खर्चाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या आजच्या अर्थसंकल्पाकडून आपेक्षाही मोठ्या आहेत. दररोजच्या आयुष्यात लागणाऱ्या वस्तू स्वस्त होतील, अशी आशा आहे.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Mumbai : मुंबई हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार, चित्रपटसृष्टीत खळबळ

यंदाच्या अर्थसंक्लात मेड इंडियाकडे जास्त प्रमाणात फोकस असू शकतो. अर्थसंकल्पात देशांतर्गत उत्पादित वस्तूंना प्रोत्साहन देणे, रोजगार वाढवणे आणि कर प्रणाली सुलभ करणे यावर फोकस असू शकतो. आरोग्य, गृहनिर्माण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांवरही विशेष लक्ष असेल. पाहूयात, कोणत्या वस्तू स्वस्त होणार, कोणत्या महाग होणार?

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Mumbai : मुंबई हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार, चित्रपटसृष्टीत खळबळ

कोणत्या वस्तू स्वस्त होणार ?

भारतात तयार होणारे मोबाईल फोन आणि त्याच्या सुट्ट्या भागावर कर सवलत मिळू शकते. त्यामुळे मोबाइलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होऊ शकतात.

होमलोनवरील करसवलतीची मर्यादा वाढवल्याने मध्यमवर्गीयांना घर घेता येऊ शकेल.

आरोग्य विमा आणि आवश्यक औषधांवरील कर सवलतीमुळे वैद्यकीय खर्च कमी होऊ शकतो.

ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी, बॅटरी आणि इतर आवश्यक घटकांवरील कर कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. या निर्णामुळे , ई-स्कूटर आणि ई-कार स्वस्त होतील.

भारतात तयार झालेले टीव्ही, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरसारख्या वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

कोणत्या वस्तू महागणार ?

परदेशातून येणाऱ्या महागड्या कपडे, घड्याळे आणि ब्रँडेड उत्पादनांवर कर वाढू शकतो. त्यामुळे या वस्तूंच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.

विदेशातून आयात केलेल्या गाड्या, सौंदर्यप्रसाधने आणि परफ्यूम यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

आयात शुल्कात बदल झाला तर दागिन्यांच्या किमतीत चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे सोनं अन् चांदीच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?
Pune : पुणे पोलीस दलात हळहळ, बड्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, मध्यरात्री काळाचा घाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com