Maharashtra Politics: तेराव्या दिवसानंतर गौप्यस्फोट करणार; पवार कुटुंबियातील बड्या नेत्याचा सूचक इशारा

Mla Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या वादात आमदार रोहित पवार यांनी गंभीर इशारा दिलाय. पुढील १३ दिवसांत मोठ्या गौप्यस्फोट करणार असल्याचं रोहित पवार म्हणालेत.
 Mla Rohit Pawar:
Amid the NCP merger controversy, MLA Rohit Pawar hints at a major political revelation, saying he will disclose everything after 13 days.saam tv
Published On
Summary
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून राजकारण तापले आहे.

  • शरद पवार गटाकडून अजित पवार विलिनीकरणास इच्छुक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

  • अजित पवार गटाने विलिनीकरणाच्या चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय.

दोन्ही राष्ट्रवादी कँग्रेस पक्ष विलिनीकरणावरून राजकारण तापलंय. दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं, अशी इच्छा अजित पवार यांची होती, असा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय. तर दुसरीकडे विलिनीकरणाबाबत अजित पवारांनी चर्चा केली नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत. यापार्श्वभुमीवर आमदार रोहित पवार यांनी सूचक इशारा दिलाय. अजित पवारांसोबत काय चर्चा झाली? या सगळ्या प्रक्रियेत मी होतो. तेरा दिवसांनी मी सर्व सांगेल, असं म्हणत त्यांनी इशारा दिलाय.

 Mla Rohit Pawar:
Deputy CM Maharashtra: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार सक्रिय;'या' जिल्ह्याचा करणार दौरा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरात शोकाकुल वातावरण आहे. मात्र निधनाच्या तिसऱ्याच दिवसापासून राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. शोकात बुडालेल्या पवार कुटुंबात दोन गट पडली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ लागल्या चर्चा सूरू असतानाच आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या मार्गावर गेल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचवेळी रोहित पवार यांनी केलेल्या विधानामुळे भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांच्या समर्थकाचा मृत्यू झाला होता. अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख होती. आज रोहित पवार यांनी बोडके यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात इशारादेखील दिला.

पक्ष विलिनीकरणाबाबत अजित पवारांसोबत काय चर्चा झाली? सगळ्या प्रक्रियेत मी होतो. तेरा दिवसांनी मी सर्व सांगेल, असे रोहित पवार म्हणाले. पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सांगेन. 13 दिवस ज्यादिवशी होतील, त्या दिवशी मी सांगेन. आता राजकीय बोलणे योग्य नाही, असे रोहित पवारांनी म्हटलंय.

 Mla Rohit Pawar:
अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

यावेळी रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपविधीबाबतही भाष्य केलं. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार हे कोणाला माहीत नव्हते. लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते. पार्थ देखील होता. आम्हाला शपथविधीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून कळाली, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

बोडके कुटुंबियांची घेतली भेट

सुदाम बोडके हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. अजित पवार यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यात सुदाम बोडके यांचा मृत्यू झाला होता. सुदाम बोडके नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी. सुदाम बोडके यांना अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून तीव्र धक्का बसला होता. निधनाचे वृत्त ऐकून ते अस्वस्थ झाले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये गेले, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज रोहित पवार यांनी बोडके कुटुंबियांची भेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com