

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक व वक्फ, क्रीडा व मंत्रालयाचा पदभार स्वीकारलाय. आता त्यांचा पहिला दौरा ठरला असून त्या सातारा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. येथील कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.
राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. शनिवारी दुपारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सभागृह नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांनी लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्या दोन दिवसात सातारा जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला.
या अपघातात अजितदादांचे पीएसओ विदीप जाधव यांचेही निधन झाले होते. विदीप जाधव हे फलटण तालुक्यातील तरडगावचे रहिवाशी होते. विदीप जाधव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान विदीप जाधव यांच्या कुटूंबाची आमदार रोहित पवारांनी शनिवारीच भेट घेतली होती. त्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला जाणार आहेत.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, 'अजितदादांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत आहे. यावेळी ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारतेय.' महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झालंय. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिलाय. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.