नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली असून प्रमुख पक्षासोबत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत अनेक रंग पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत असताना भाजपचे माजी आमदार प्रा.अनिल सोले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी संबंधित नितेश कराळे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. कराळे यांनी पदवीधर बेरोजगारी, सरकारी नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता यांसारखे मुद्दे मांडत निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रमण सेनाड हेही अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत पक्षीय उमेदवारांसोबतच विविध गटांचे उमेदवार मैदानात दिसत आहेत.
वंचित बहुजन आघाडीकडून मंगेश वानखेडे यांचे नाव आहे. तर सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त संजय थुल यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. बहुजन समाज पक्षाने यंदा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर थुल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
संजय थुल यांनी पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. २६ सप्टेंबर ही नोंदणीची अंतिम तारीख असताना त्या दिवशी किती अर्ज दाखल झाले, याची माहिती पुढील दिवशीही देण्यात आली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. अंतिम तारखेनंतरही मागच्या दाराने अर्ज स्वीकारले जात असल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.