समृद्धी महामार्ग बनतोय गांजा तस्करीचा मार्ग? दोन ट्रकमधून 350 किलो गांजा जप्त, वाशिम पोलिसांची मोठी कारवाई

350 Kg Ganja Seized From On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर वाशिम पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांत दोन ट्रकमधून 350 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास सुरूय.
350 Kg Ganja Seized From On Samruddhi Mahamarg
Washim police major action against ganja smugglingsaam tv
Published On: 
Summary
  • समृद्धी महामार्गावर दोन ट्रकमधून 350 किलो गांजा जप्त

  • वाशिम पोलिसांची गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई

  • समृद्धी महामार्गावर गांजा तस्करीचा पर्दाफाश

मनोज जैस्वाल, साम प्रतिनिधी

समृद्धी महामार्ग गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या कारवायांमुळे चर्चेत आलाय. चोरी, दरोडा, तस्करींच्या घटनांमुळे राज्याच्या विकासाला चालना देणारा महामार्ग आता गुन्हेगारी कारवायांमुळे कुप्रख्यात होतांना दिसतोय. वाशिम पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमधून ३५० किलो गांजा जप्त केला आहे.

वाशिम पोलिसांनी गांजाची तस्करी करणारे दोन ट्रक जप्त करत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. या मोठ्या कारवाईमुळे गांजा तस्करीच मोठ रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात नेमकी आरोपी किती आहेत हे तपासाअंती समोर येणार असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली.

मालेगाव पोलिसांना माहिती मिळाली की,समृद्धी महामार्गावर मालेगाव परिसरात एका ट्रक मधून गांजाची तस्करी करत असल्याच्या माहितीवरून वाहनाची तपासणी केली असता या वाहनात गांजाची वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत त्या ट्रक मधून तब्बल 150 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आला आहे.

तर दुसरी कारवाई समृद्धी महामार्गावरील कारंजा परिसरात करण्यात आली. छत्तीसगडच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका आयशर ट्रकमधून गोपनीय पद्धतीने केबिनच्या आतमध्ये गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनातून तब्बल 200 किलो गांजा जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळाला. या दोन्ही कारवाईतून तब्बल 350 गांजा जप्त करण्यात आलाय. या दोन्ही कारवाईत दोन ट्रकसह एकूण दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे.

350 Kg Ganja Seized From On Samruddhi Mahamarg
बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

या दोन्ही कारवाईंबाबत पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी माहिती दिली की,गांजा विरोधी करण्यात आलेल्या दोन कारवायांमध्ये 350 किलो गांजा जप्त करण्यात आलाय.आज सकाळी या कारवाया करण्यात आल्या आहेत.मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत गस्त घालणाऱ्या पोलिसांना एका ट्रकवर संशय आला होता. पोलिसांनी ट्रक थांबवला त्यावेळी ट्रक चालक वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी त्या ट्रकमधून 150 किलो गांजा जप्त केला.

350 Kg Ganja Seized From On Samruddhi Mahamarg
Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

समृद्धी महामार्ग हा अवैद्य वाहतुकीचा महामार्ग झाला तर नाही ना ?असा प्रश्न मागील काही दिवसात झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर खासगी वाहनांना अडवून पैशांची लूट करण्यात येत असल्याच्या घटना घडल्या होत्या.कारंजा परिसरात दुसरी एक कारवाई झाली. छत्तीसगडमधील महासमुद्र जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार सर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम पोलिसांनी महामार्गावर आयशर ट्रक अडवला त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत ट्रकच्या केबिनमध्ये गांजा लपवण्यात आल्याचं आढळून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com