मुंबई आणि नाशिक या दोन महत्वाच्या शहरांमधील रेल्वे प्रवास आता अधिक सुरळीत आणि होणार आहे. नाशिक ते मुंबई अपडाऊन करणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे. मागच्या काही वर्षांपासून मुंबई ते नाशिक लोकल सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती. यासाठी चाचपणी ही करण्यात आली होती. मात्र कसारा घाटातील तांत्रिक अडचणीमुळे ही लोकल सेवा सुरू नाही होऊ शकली. मात्र आता मुंबई-नाशिक एसी लोकल सेवा सुरू करणार असल्याचे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात या प्रकल्पाबाबत माहिती दिली. या नवीन रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई आणि नाशिकमधील कनेक्टीव्हीटी तर सुधारेलच,पण दोन्ही औद्योगिक शहरांमधील आर्थिक विकासालाही मोठी गती मिळणार आहे.
यावेळी गिरीश महाजन यांनी मुंबई-नाशिक एसी लोकल सेवा सुरू करणार आणि मुंबई-नाशिक प्रवास दोन तासांवर आणणार, अशी ग्वाही दिली. मुंबई-नाशिक जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून लवकरच त्याची सुरुवात होईल. कसाऱ्यापर्यंत येणारी लोकल नाशिकपर्यंत आणत आहोत. म्हणजे दोन तासांत मुंबई-नाशिक गाठता येईल. नाशिकच्या विकासात यामुळे हातभार लागेल. काही तांत्रिक कारणांमुळे साधी लोकल चालवली जाऊ शकत नाही; पण एसी लोकल चालवण्यात कोणतीही अडचण नाही. तशी मागणीही मी केली आहे. लवकरच ही लोकल सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे प्रश्न सुटलेला नाही, असे खळबळजनक वक्तव्य करत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत 'देवाला माहित' असे सूचक विधान केले.नाशिक येथे एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान मंत्री महाजन यांनी पालकमंत्रीपदाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, नाशिकबाबत कुठेही वाद नाही, पण रायगडसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप टोकाचे मतभेद आहेत.
त्यामुळे हा प्रश्न सुटू शकलेला नाही. ते आम्हाला म्हणतात, नाशिक तुम्ही घेऊन टाका आणि रायगड आम्हाला द्या. रायगडला एकच पालकमंत्री होणार आहे आणि दोघांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटलेला नाही. नाशिकला पालकमंत्री कधी मिळणार, या प्रश्नावर त्यांनी, आता देवाला माहित आपण काय सांगणार? देवाच्या भरवशावर सोडून देऊ, असे उत्तर दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.