Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?

Raksha Khadse Talk On Mahajan And Eknath Khadse: रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. या दोघांमुळे माझं सँडविच होत असल्याचे त्या म्हणाल्या.
Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?
Raksha Khadse Talk On Mahajan And Eknath Khadse
Published On

Summary -

  • रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच खडसे–महाजन वादावर प्रतिक्रिया दिली

  • 'दोघांच्या वादामुळे माझं सँडविच होतं' असं विधान त्यांनी केले

  • रक्षा खडसे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण

  • चोपडा येथील प्रचारसभेत त्यांनी हे विधान केले

संजय महाजन, जळगाव

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे एकनाथ खडसे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वादावर भाष्य केले आहे. एकीकडे सासरे आणि दुसरीकडे वडिलांसारखे असलेले पक्षाचे नेते या दोघांच्या वादामुळे आपली घुसमट होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रक्षा खडसे म्हणाल्या, 'दोघांच्या वादामुळे माझं सँडविच होतं'. सासरे म्हणून एकनाथ खडसे यांचा आदर आहे, तर गिरीश महाजन हे वडिलांसमान आणि पक्षाचे नेते असल्याने तेही जवळचे आहेत.', असे त्या म्हणाल्या. रक्षा खडसे यांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

जळगावच्या चोपडा येथे प्रसारसभेसाठी रक्षा खडसे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्याबाबत मोठं विधान केले. त्या म्हणाल्या की, 'एकीकडे नाथाभाऊ सासरे आहेत, तर दुसरीकडे मंत्री गिरीषकाका वडिलांसारखे आहेत. दोघांच्या वादामुळे माझा सँडविच नक्कीच होतो.' एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्व राज्याला परिचित आहेत. मुक्ताईनगर भाजपचा एक गट शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मदत करत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर रक्षा खडसे बोलत होत्या.

Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?
Maharashtra politics : चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

'माझा विषय सोडा भाजपची ताकद होती म्हणून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आले. भाजपच्या मतांवरतीच मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा आमदार निवडून आला. चोपडा येथील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे सहभागी झाल्या होत्या. चोपडामध्ये भाजप आणि अजित पवार गटाची युती असून दुसरीकडे शिवसेना शिंदे गट विरोधात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?
Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com