राज्यातील अभद्र युती आणि आघाड्यांनी दिवसाढवळ्या लोकशाहीचे धिंडवडे काढलेत...आणि याला कारण ठरलयं... राज्यातील फोडाफोडीचं राजकारण....महायुतीतील मित्रपक्षांना शह देण्यासाठी भाजपनं सुरु केलेलं ऑपरेशन लोटस शिंदेसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरलयं....कारण यापूर्वी केवळ इच्छुकांवरून रस्सीखेच सुरू होती. मात्र आता तर माघारीची तारीख उलटल्यानंतरही शिंदेसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवारालाच भाजपनं पळवून नेलंय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री भाजपनं शिंदेसेनेला हा धक्का दिलाय.
महायुतीतील ही फोडाफोडी फक्त फुलंब्री नगरपालिकेपूर्ती मर्यादा नाहीय... छत्रपती संभाजीनगरमधील 6 नगरपालिका निवडणूकीत भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच पाहयाला मिळतोय...
सिल्लोडमध्ये शिंदेसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांच्याविरोधात भाजपचे मनोज मोरेलू हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत...
गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेनेचे ऋषिकेश पाटील आणि भाजपचे प्रदीप पाटील हे आमनेसामने आहेत...
खुलताबादमध्ये बाबासाहेब बारगळ हे शिंदेसेनेचे तर भाजपचे परसराम बारगळ हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
वैजापूरमध्ये शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय जाधव एकमेंकासमोर उभे राहिलेत...
कन्नड नगरपरिषदेत शिंदेसेनेच्या अनिता कवडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्वाती कोल्हे आमने-सामने आहेत...
पैठणमध्ये शिंदेसेनेकडून विद्या कावसानकर तर भाजपकडून मोहिनी सूरज लोळगे या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.
भाजपनंच ऑपरेशन लोटस सुरू केल्यामुळे शिंदेसेना बेजार झाली होती. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी थेट दिल्लीत जाऊन अमित शाहांपुढे त्रागा केला. मात्र तरीही राज्यातल्या भाजपच्या नेत्यांवर त्याचा काहीही परिणाम न झाल्याचं फुलंब्रीतल्या घटनेवरून दिसतंय.यामुळे मात्र सत्तेसाठी जे पक्ष आपल्या युती आणि आघाडीतल्या मित्रपक्षांना दगा द्यायला मागेपुढे पाहत नाहीत ते जनतेच्या विश्वासाला किती पात्र ठरणार हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.