राज्यसभेवरून शिवसेनेत रस्सीखेच, ४ दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत; एकनाथ शिंदेंची पसंती कुणाला?

Rajya Sabha Tug of War in Shiv Sena: शिवसेना (शिंदे गट) मध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गजानन कीर्तीकर, राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांची नावं चर्चेत असून अंतिम निर्णय एकनाथ शिंदे यांच्या हाती आहे.
Senior Shiv Sena leaders await Eknath Shinde’s decision amid Rajya Sabha nomination race in Maharashtra
Senior Shiv Sena leaders await Eknath Shinde’s decision amid Rajya Sabha nomination race in MaharashtraSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

महाराष्ट्र विधानसभेतून शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यसभेवर उमेदवारी मिळावी, अशी विनंती करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ व निष्ठावंत नेते, माजी खासदार गजानन कीर्तीकर हे येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. पक्षातील प्रदीर्घ अनुभव आणि वैधानिक तसेच संघटनात्मक कामाचा ठसा लक्षात घेता राज्यसभेसाठी आपली निवड व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Senior Shiv Sena leaders await Eknath Shinde’s decision amid Rajya Sabha nomination race in Maharashtra
Gram Panchayat : ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता गावचा कारभार कोण हाकणार?

ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यापासून कीर्तीकर यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता गेली चार वर्षे पक्षासाठी काम केले आहे. सध्या ते गोवा राज्य संपर्कनेते तसेच स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या विविध पदांवरील अनुभवाच्या जोरावर राज्यसभेत पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडू शकतो, असा त्यांचा दावा आहे.

Senior Shiv Sena leaders await Eknath Shinde’s decision amid Rajya Sabha nomination race in Maharashtra
महायुती सरकार कोसळणार? वाल्मीक कराडचं नाव घेत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे शिवसेना (ठाकरे गट) कडून निवडणूक लढवत असताना गजानन कीर्तीकर यांनी कौटुंबिक नात्यांपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) च्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करत पक्षाप्रती आपली निष्ठा अधोरेखित केली होती. या भूमिकेची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा झाली होती.

Senior Shiv Sena leaders await Eknath Shinde’s decision amid Rajya Sabha nomination race in Maharashtra
Accident News : लग्नानंतर अघटित घडलं, ३५ जणांचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या ट्रकला भीषण अपघात

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) कडून राहुल शेवाळे आणि संजय निरुपम हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती असून, पुढील काही दिवसांत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com