

राहुल गांधींना बोलू न दिल्याने संसदेत मोठा गोंधळ
संसदेत विरोधी पक्षातील खासदार आक्रमक
सभागृहात पेपर भिरकावल्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा
संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने विरोधी पक्षातील खासदारांनी मोठा राडा केला. यामुळे विरोधी पक्षातील समाजवादी पक्ष, टीएमसीच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी खासदारांनी विरोधी पक्षातील खासदारांनी पेपर भिरकावले. यामुळे 6 खासदारांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभा अध्यक्षांवर पेपर भिरकावणे ६ खासदारांना महागात पडले आहे. सहा खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. संसदेत राडा झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कामकाज ३ वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली.
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पेपर भिरकावणाऱ्या खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर प्रस्ताव पारित झाल्यानंतर या ६ खासदारांना निलंबित करण्यात आलं. यामध्ये मणिकम टागोर, गुरजीत औजला, राडा वडिंग, हिबी ईडन,किरण रेड्डी आणि वेंकट रमन यांच्या नावाचा समावश आहे.
संसदेत चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील सदस्यांनी पेपर फाडून लोकसभा अध्यक्षांवर भिरकावले. त्यानंतर संसदेत एकच गोंधळ उडाला. त्यामुळे तातडीने या खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांना नियम ३७४ अंतर्गत संपूर्ण अधिवेशनाच्या काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे ६ खासदारांना अधिवेशनासाठी संसदेत उपस्थित राहता येणार नाही.
राहुल गांधी यांच्याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी बोलण्यासाठी दुसऱ्यांचं नाव घेतलं. त्यामुळे समाजवादी पक्ष, टीएमसी आणि इतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेत बोलण्यास नकार दिला. ६ खासदार हे राहुल गांधी यांच्या समर्थनात पुढे आले. त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने पेपर भिरकावले. यामुळे संसदेत मोठा राडा झाला. त्यामुळे तीन वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.