राहुल गांधींच्या भाषणावरून संसदेत गदारोळ; सत्ताधारी आक्रमक, नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi news : राहुल गांधींच्या भाषणावरुन संसदेत चांगलाच गदारोळ झाला.. मात्र राहुल गांधींच्या कोणत्या वक्तव्यानं सत्ताधारी आक्रमक झाले... आणि या चर्चेत माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंचा उल्लेख का करण्यात आला.. पाहूयात...
Rahul Gandhi
Rahul Gandhi newssaam tv
Published On

होय.... राहुल गांधींचा हाच घाव भाजपच्या चांगलाच वर्मी लागला... आणि लोकसभेत एकच गदारोळ झाला....

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत राहुल गांधींनी निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला..... आणि राजनाथ सिंह, अमित शाहांसह भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले....

मात्र या वादाची ठिणगी पडली.. ती बंगळुरुचे भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी काँग्रेसच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित केल्यानं...

Rahul Gandhi
Tuesday Horoscope : आनंदाला सीमा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार घडणार

हाच मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या चांगलाच जिव्हारी लागला.. आणि त्यांनी थेट माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकावर आधारित प्रसिद्ध झालेला लेख संसदेत आणला...आमच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित केला जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला... मात्र आम्ही कुणीच तुमच्या देशभक्तीवर आणि चारित्र्यावर संशय घेतला नसल्याची सारवासारव गृहमंत्री अमित शाहांना करावी लागली.

राहुल गांधींच्या आरोपांनंतर संसद स्थगित करण्यात आली... मात्र त्या लेखात नेमकं काय म्हटलंय.. ते राहुल गांधींनी माध्यमासमोर उघड केलंय..

Rahul Gandhi
महाराष्ट्रातील प्रसिद्ध युट्युबर, इन्स्टाग्रामवर ३ लाख फॉलोवर्स; ड्रग्ज तस्करी करताना रंगेहाथ सापडला

खरंतर मनोज नरवणे हे लष्करप्रमुख असताना ऑगस्ट 2020 मध्ये भारतानं स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या माध्यमातून कैलास रेंजमधील रेचिन ला आणि रेझांग ला मधील टेकड्यांवर ताबा मिळवला... त्यानंतर चीनने 100 मीटरपर्यंत रणगाडे आणले होते... त्यावेळी संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट आदेश न दिल्यानं कोंडी झाल्याचा दावा नरवणेंनी केलाय.. हाच धागा पकडून राहुल गांधी सत्ताधाऱ्यांना संसदेसोबतच रस्त्यावरही घेरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com