पाकचा टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; भारत-पाक क्रिकेट युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'

पाकचा टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; भारत-पाक क्रिकेट युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'

india vs pakistan : T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकलाय... मात्र पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्याच क्रिकेट संघासाठी कसा आत्मघातकी ठरणार आहे... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Published on

टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी एकीकडे भारतीय क्रिकेट संघ सज्ज झालेला असताना पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा ड्रामा सुरु केलाय... पण बांगलादेशच्या वादात उडी घेत पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय त्याच्यासाठी कसा आत्मघातकी ठरणार पाहूयात...

पाकचा टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; भारत-पाक क्रिकेट युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; १२० फ्लॅटसाठी लॉटरी, कुठे-कुठे आहेत घरे?

पाकिस्तानचं बहिष्कार नाट्य कशासाठी?-

बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला IPL मधून बाहेर काढलं

सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला

आयसीसीकडून बांगलादेशला निर्णय मागे घेण्यासाठी अंतिम मुदत

बांगलादेशनं निर्णय मागे न घेतल्यानं स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश

पाकिस्तानाकडून बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार

पाकचा टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; भारत-पाक क्रिकेट युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'
महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

दरम्यान पाकिस्तानने भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला, तर मैदानावर न उतरताच टीम इंडियाचा विजय पक्का होणार आहे...तर भारतविरुद्ध न खेळल्यास पाकिस्तानचे 2 पॉईंट कापले जातील.. त्याशिवाय पाकिस्तानने लेखी स्वरुपात नकार दिल्यास पाकिस्तानला संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकतं.

पाकचा टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; भारत-पाक क्रिकेट युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'
राजकारणात मोठा उलटफेर; ठाकरे महापौर होणार, भाजपकडून घोषणा

त्यामुळे पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे. आता 15 फेब्रुवारीला होणारा हा सामना पाकिस्तान खेळणार की पळ काढणार? याकडे क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com