मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; १२० फ्लॅटसाठी लॉटरी, कुठे-कुठे आहेत घरे?

mhada lottery 2025 : सर्वसामान्यांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाची घरे कुठे-कुठे उपलब्ध आहेत, जाणून घ्या.
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; १२० फ्लॅटसाठी लॉटरी, कुठे-कुठे आहेत घरे?
Published On
Summary

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी

म्हाडाकडून १२० फ्लॅटची विक्री करण्याचा निर्णय

घरासाठी ५ फेब्रुवारी २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरू

संजय गडदे, साम टीव्ही

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. म्हाडा मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर १२० फ्लॅटची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती आली आहे. या सर्व घरांसाठी अर्जदारांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. या अंतर्गत यापूर्वी सोडतीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क भरणे, सदनिका निश्चितीची प्रक्रिया १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. सदनिका निश्चित केल्यानंतर अर्जदाराला विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा ४८ तासांच्या आत करणे बंधनकारक राहणार आहे. ठराविक कालावधीत भरणा न केल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होऊन भरलेली अनामत रक्कम म्हाडाकडे जमा केली जाईल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; १२० फ्लॅटसाठी लॉटरी, कुठे-कुठे आहेत घरे?
मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

या योजनेअंतर्गत शिंपोली कांदिवली, चारकोप सेक्टर-८, अँटॉप हिल-वडाळा, तुंगा-पवई, मानखुर्द, मालवणी-मालाड आदी ठिकाणी एकूण ८४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(५) व ३३(७) अंतर्गत घाटकोपर पूर्व, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी पश्चिम येथील ३६ सदनिकाही विक्रीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; १२० फ्लॅटसाठी लॉटरी, कुठे-कुठे आहेत घरे?
कुणाला नकोय राष्ट्रवादीचं विलिनीकरण? अजितदादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाच्या चर्चेला जोर

अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तो भारतीय नागरिक असावा. अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक तसेच लागू असल्यास जात प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. आरक्षण प्रवर्गातील अर्जदारांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार; १२० फ्लॅटसाठी लॉटरी, कुठे-कुठे आहेत घरे?
राजकारणात मोठा उलटफेर; ठाकरे महापौर होणार, भाजपकडून घोषणा

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पडणार असून सर्व आर्थिक व्यवहार नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे करावे लागतील. या योजनेसाठी कोणताही दलाल किंवा प्रतिनिधी नेमण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन म्हाडा मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळ, हेल्पलाइन क्रमांक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com