

नागपूर महापालिकेत भाजपने महापौरपदासाठी नीता ठाकरे यांच्या नावाची घोषणा
महापौर आणि उपमहापौर निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार
भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना काँग्रेस निवडणूक लढवणार
पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नागपूर महापालिका निकालानंतर भाजपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे. निकालानंतर महापौरपदासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, या लढाईत भाजपने जोरदार आघाडी घेतल्याचं दिसत आहे. भाजप शहाराध्यक्षांनी नीता ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
नागपूर महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी ६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज स्वीकारले जातील. नामांकन प्रक्रिया सिव्हिल लाईन्स येथील महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होईल.
भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी काँग्रेसनेही अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदासाठी मतदान अटळ झाले आहे. भाजप शहर अध्यक्ष यांनी थेट महापौरपदासाठी नीता ठाकरे यांच्या नावाची घोषणा केल्याने चित्र स्पष्ट झालं आहे.
भाजप नवनिर्वाचित नगरसेवकांची नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नागपुरातील राजवाडा पॅलेस येथे बैठक झाली. महापौर निवडीसाठी गडकरी आणि फडणवीस यांच्या चर्चा झाल्यानंतर महापौरपदाबाबत रूपरेषा ठरवण्यात आली. महापौरपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. नीषा आतकरे, संतोष लढा, नीता ठाकरे, दिव्या धुरडे, विशाखा मोहोड, शिवानी दाणी,अश्विनी जिचकार यांच्या नावाची चर्चा होती. परंतु महापौरपदाची माळ नीता ठाकरे यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.